गुढे, ता. भडगाव : अचानक विजेचा दाब वाढल्याने येथील अनेकांचे विद्युत साहित्य व उपकरणे जळून खाक झाले. यामुळे प्रचंड नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.दहा हजारच्या वर लोकसंख्या असलेले गुढे या गावात गेल्या सहा महिन्यापासून कायमस्वरूपी वायरमन नसल्याने येथील वीज ग्राहक महावितरण कंपनीने जणू वाऱ्यावर सोडले आहेत. रात्री-अपरात्री लाइट जाणे नेहमीचेच झाले आहे. दिनांक ११ रोजी दुपारी अचानक गावातील भवानी मंदिर डीपी वरून विजेचा दाब वाढल्याने घरातील टीव्ही, फ्रीज, सेटटॉप बॉक्स, वीज मीटर बोर्ड, पंखा या सारख्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत.गावातील तीन गल्ल्यांमध्ये हा प्रकार घडला. यामुळे नागरिक भयभीत झाले होते. या घटनेने दोनलाखावर नुकसान झाले आहे.गावात विजेच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील वरिष्ठ अधिकाºयांनी वायरमनच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. अशा भोंगळ कारभारामुळे एखाद्या दिवशी जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या घटनेची दखल घेवून तरी गावासाठी कायमस्वरूपी वायरमन यांची नेमणूक करावी आणि झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
विजेचा दाब वाढल्याने अनेकांची उपकरणे खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 4:54 PM