भुसावळ : सरकारच्या वन नेशन वन बजेटमुळे रेल्वेच्या सुमारे पाच हजार ४०० कोटी रुपयांची बचत झाली आहे शिवाय एकच अर्थसंकल्प असल्याने रेल्वेतील प्रकल्पांना पुरेसा निधी मिळेल व प्रकल्प पूर्ण होतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) सुधीरकुमार गुप्ता यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. रेल्वेत सौर ऊर्जेचा वापर वाढला असून भुसावळ रेल्वे विभागाने या क्षेत्रात चांगले काम केले आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. दरम्यान, नाशिक येथील इरीन प्रकल्पात ३० केव्ही पॉवर, भुसावळ रेल्वे स्थानक दहा आणि भुसावळ येथील क्षेत्रीय प्रशिक्षण संस्थेत ५०० केव्ही पॉवरचे सौर ऊर्जा पॅनल बसविण्यात आले आहे.एलईडी दिव्यांचा वापरभुुसावळ येथील रेल्वे स्थानकावर पूर्णपणे एलईडी दिव्यांचा झगमगाट आहे. जळगाव रेल्वे स्थानकावरही ८० टक्के असे दिवे बसविण्यात आले आहे. नाशिक ते इगतपुरी पर्यंत एलईडी करण्यात आले आहे. पुढे ते मनमाड पर्यंत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.भुसावळ-जळगावात लिफ्टदेशातील ५०० रेल्वे स्थानकांवर दिव्यांग प्रवाशांसाठी लिफ्ट व सरकते जिण्यांची सोय राहील, अशी माहिती देऊन त्यांनी सांगितले भुसावळ विभागातील भुसावळ-२, नाशिक २,मनमाड-२, जळगाव-२, अकोला-२ व खंडवा- २ या प्रमाणे लिफ्टची सोय करण्यात आली आहे. अपूर्ण कामे मार्चपर्यंत पूर्ण होतील.गुप्ता यांनी यावेळी २०२० पर्यंत मुख्य रेल्वे मार्गावर मानवरहित गेट बंद करण्यात येतील. भुसावळ विभागात केवळ खामगाव,जलंब या ठिकाणी तीन गेट आहेत. २०१७-१८ पर्यत देशातील ५०० रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे.यात भुसावळ रेल्वे विभागातील एकाही स्थानकाचा समावेश नसल्याचे त्यांनी सांगितले. एसएमएस प्रणालीवर क्लीन माय कोच सर्व्हीस याबाबतही त्यांनी माहिती दिली. एक खिडकी योजने अंतर्गत कोच मित्र सुविधेची त्यांनी माहिती दिली. त्यांनी रेल्वेतील पार्सलसह विविध सेवांमध्ये ९९.९ टक्के व्यवहार धनादेशाद्वारे होत असल्याचे सांगितले. एडीआरएम अरुण धार्मिक,मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. सी. एन. पिंपरीकर, सीनिअर डीईएन ए. के. सिंग, अरविंद कुमार, सिनिअर डीएमई दिनेश गजभिये, सिनिअर डीएफएम विजय कदम, सिनिअर डीईई नरहरी निमजे, डीसीएम व्ही.पी.दहाट,एसीएम अजयकुमार, विजयकुमार पालवे आदी अधिकारी उपस्थित होते.रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा खंडित४भारतीय रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्याची १९२० पासूनची परंपरा २०१७ मध्ये थांबल्याची माहिती डीआरएम गुप्ता यांनी यावेळी दिली.रेल्वेचा सहभाग जास्त असल्याने १९२० पासून वेगळा अर्थसंकल्प सादर केला जात होता.आता एकच अर्थसंकल्प असल्याने रेल्वेतील प्रकल्प पूर्ण होतील.
रेल्वेत सौर ऊर्जेचा वापर वाढला
By admin | Published: March 02, 2017 12:19 AM