तालुक्यात २६ मेपर्यंत झालेले लसीकरण
प्रा. आरोग्य केंद्र पहिला डोस दुसरा डोस एकूण
१) मंगरूळ-------१६२६ ४६२ २०८८
२) शेळावे-------१६५३ ४९२ २१४५
३) शिरसोदे-----२५१९ ६१२ ३१३१
४) तामसवाडी----१७०३ ३७३ २०७६
५) कुटीर रुग्णालय---५६११ २३६५ ७९७६
एकूण १३११२ ४३०४ १७४१६
----
लसीकरणाचा वेग वाढला पाहिजे
तालुक्यातील १८ वर्षांवरील एकूण लोकसंख्या मोठी आहे. त्या मानाने गेल्या तीन-चार महिन्यांत फक्त १७ हजार ४१६ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. पाहिजे तेवढा वेग अजूनही लसीकरणाचा झाला नाही. वरून मुबलक प्रमाणात लसही उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणी व समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरासह ग्रामीण भागात लसीकरणासाठी लोक तासंतास रांगेत उभे राहात असल्याचे दृश्य नेहमी दिसते.
तसेच नागरिक अजूनही कोरोनाला पाहिजे तेवढे गांभीर्याने घेत नसल्याचेही दिसून येते. अजूनही विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळते. बाजारात लोकांची प्रचंड गर्दी झालेली दिसते.
ऑक्सिजन प्लांट उभारणी कागदावर
कोरोनाच्या काळात सर्वांना ऑक्सिजनचे महत्त्व समजले. यातून कुटीर रुग्णालयाच्या आवारात ऑक्सिजन निर्मितीसाठी प्लांट उभा केला जाणार होता. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी पारोळा येथे एका महिन्याच्या आत ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभा राहणार, असे ठोस आश्वासन तालुकावासीयांना दिले होते. पण दीड ते दोन महिने उलटून गेले तरी हा ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट मात्र कागदावर असल्याचेच दिसून येते. खरेच हा ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभा राहणार की केवळ आश्वासन याबाबत येथे चर्चा सुरू असते.
२६ मेपर्यंत तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या
शहरी भाग ----१६५८
ग्रामीण भाग ---२८९९
–--------------------------
एकूण --४५५७
तालुक्यात बरे होणारे रुग्ण
शहरी भाग -----१६१८
ग्रामीण भाग ----२८२६
एकूण -----------४४४४
तालुक्यात २६ मेपर्यंत मृत्यू ----५३
उपचार घेत असलेले एकूण रुग्ण ---६०
----
कोट
पारोळा तालुक्यात गेल्या १० ते १५ दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्ण संख्या घटली आहे. लाट ओसरत असल्याचे दिसून येत आहे. पण, लोकांनी काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कारण या परिस्थितीत मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुऊन घेणे, सामाजिक अंतर पाळणे हे करणे महत्त्वाचे आहे. गाफील न राहता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ याचे पालन या काळात केले गेले पाहिजे.
- डॉ. योगेश साळुंखे
वैद्यकीय अधिकारी, कुटीर रुग्णालय, पारोळा.