जळगाव : भारतीय स्वातंत्र्याच्या ७१वा वर्धापन दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कृषि व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी आमदार चंदूलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक मतानी, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप वनसंरक्षक दिगंबर पगार, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील, जितेंद्र पाटील, प्रमोद भामरे, चिटणीस मंदार कुलकणी, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार अमोल निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलीस दलातील सहायक पोलीस उप निरिक्षक रवींद्र बळीराम सपकाळे यांना पोलीस पदक जाहीर झाल्याबद्दल तसेच मागील वर्षी संगणीकरणाचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी प्रमोद बोरोले, सहायक सूचना अधिकारी महेश पत्की यांचा सदाभाऊ खोत यांच्याहस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पोलीस बॅन्ड पथकाने देशभक्तीपर गीते सादर केली. या कार्यक्रमापूर्वी भारतीय स्वातंत्र्याचा 71 वा वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर प्रशासकीय इमारत येथे उप वनसंरक्षक दिगंबर पगार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी तंबाखू विरोधी शपथ घेतली.
Independence Day : जळगाव जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात, सदाभाऊ खोत यांच्याहस्ते शासकीय ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 12:58 PM
विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
ठळक मुद्देप्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कारतंबाखू विरोधी घेतली शपथ