शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

अपक्ष उमेदवार ज्योती महाजन यांच्या पतींनी घेतली राज्यमंत्र्यांची भेट

By admin | Published: February 28, 2017 12:10 AM

उत्सुकता : शिवसेनेत उपसभापतीपदासाठी लॉबींग

जळगाव : आसोदा गणातील अपक्ष निवडून आलेल्या ज्योती महाजन यांचे पती तुषार महाजन यांनी नुकतीच सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची पाळधी येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तुषार महाजन हे शिवसेना समर्थक आहे. त्यांना आसोदा   गणातून सेनेतर्फे उमेदवारी हवी होती, पण त्यांचा विचार झाला नाही. त्यामुळे तुषार महाजन यांनी  पत्नी ज्योती महाजन यांना अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले. त्यात त्या विजयी झाल्या आहे. विजयानंतर तुषार महाजन यांनी राज्यमंत्र्यांची भेट घेतली. राज्यमंत्री पाटील व महाजन यांच्यातील चर्चेचा तपशील मात्र समोर आलेला नाही. सदस्यांमध्ये याबाबत उत्सुकता आहे.

सेनेला उपसभापतीपदपं.स.मध्ये तीन भाजपा, दोन अपक्ष व पाच सेनेचे सदस्य निवडून आले आहेत. बहुमतासाठी एक सदस्याची गरज आहे. त्यात कोण कुणाच्या बाजूने जातो हा मुद्दा आहे. याच पार्श्वभूमीवर तुषार महाजन यांनी गुलाबराव यांची भेट घेतल्याने  शिवसेनेचे बळ वाढेल, असा मुद्दा चर्चिला जात आहे.

सभापती भाजपाचापं.स.मध्ये सभापतीपद हे अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे. या प्रवर्गातून फक्त भाजपाच्या यमुना रोटे या नशिराबाद गणातून निवडून आल्या आहे. त्यामुळे यमुना रोटे या सभापती झाल्याचे निश्चित आहे, पण उपसभापतीपदी कुणाची वर्णी लागेल याबाबत उत्सुकता आहे. उपसभापती शिवसेनेचा होणार आहे. त्यासाठी ज्योती महाजन, ललिता जनार्दन पाटील आदी नावे चर्चेत आहेत.