आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, जि.जळगाव, दि. २७ : शहरात महिलांसाठी शौचालय, स्वतंत्र महिला रुग्णालय व प्रत्येक प्रभागात बाकडे व खेळणी उभारण्याचा ठराव पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेत करण्यात आला.पालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती रंजना यशवंतराव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेत महिला व बाल कल्याण समितीची सभा उत्साहात झाली. त्यात विविध ठराव करण्यात आले.रंजना सोनवणे यांनी शहरात महिलांसाठी स्वतंत्र महिला रूग्णालयाची निर्मिती करण्याचा ठराव शासनास पालिकेच्या व महिला बालकल्याण समितीच्या वतीने पाठवून शासनाने तो मंजूर करावा यासाठी प्रयत्न करण्याचा ठराव सर्व उपस्थित सदस्यांनी बहुमताने मंजूर केला.तसेच शहरातील गरीब विद्यार्थिनी व महिलांसाठी शाळा, कॉलेजेस, हायस्कूलमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिग मशिन बसवून पाळीच्या काळात फक्त पाच रुपयात महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे १० पॅडचे पाकीट फक्त पाच रुपये मशिनमध्ये टाकून पॅडपाकिट मिळेल. यासाठी तसे किमान १० ठिकाणी असे पॅड वेंडिंग मशिन बसविण्यात यावेत, असा ठराव बहुमताने मंजूर केला.या वेळी विभागप्रमुख दीपक देशमुख, भूषण लाटे यांनी विविध विषयांवर मान्यवरांच्या ठराव व सूचनांबाबत चर्चा केली. नगरसेविका अलका गवळी यांनी आभार मानले.
महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:11 AM
चाळीसगाव : महिला व बालकल्याण समितीच्या सभेत ठराव मंजूर
ठळक मुद्देप्रत्येक प्रभागात किमान १० सिमेंट बाकडे देण्यासाठीचा ठराव नगरसेविका अलका सदाशिव गवळी व विजया प्रकाश पवार (सेना), झेला पाटील यांनी मांडला व त्यास बहुमताने मंजुरी दिली.प्रत्येक प्रभागात लहान मुलांना खेळणी बसविण्याबाबतचा नगरसेविका विजया भिकन पवार, वंदना जगदीश चौधरी व वत्सला महाले यांच्या सूचनेनुसार ठराव मंजूर केला.शहरातील अंगणवाड्यांच्या परिसरात स्वच्छता ठेवणे, लहान बालके, कुपोषित मुले व गरोदर मातांची आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करणे आदी ठराव बहुमताने मंजूर करण्यात आले.