साक्री, दि.5- पाकिस्तान हद्दीत गेल्यानंतर सर्व संपल्यासारखे वाटत होते. परंतु, आजी, आजोबांचे व भारत मातेच्या आशीर्वादामुळे मी जीवंत आहे, असे प्रतिपादन सीमारेषा ओलांडून पाकिस्तान हद्दीत गेलेल्या चंदू चव्हाण यांनी येथे व्यक्त केले.
साक्री तालुका प्रेस क्लब व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जवान चंदू चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील राजे लॉन्स येथे करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश सोनवणे, साक्री नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल तांबे, तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष आबा सोनवणे, ंधा पाटील, डॉ. नितीन सोनवणे उपस्थित होते. यावेळी जवान चंदू यांचे बंधू भूषण यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शहरातील वसतिगृहातील विद्यार्थिनींनीही जवान चंदू चव्हाण यांचा सत्कार केला.
मंत्री डॉ. सुभाष भामरे देवदूतासारखे प्रकटले..
जवान चंदू चव्हाण पुढे म्हणाले, की केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे देवदूतासारखे प्रकटले. पाकिस्तान सीमा हद्दीत गेल्याचे निश्चित झाल्यानंतर त्यांनी पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रय}ांना यश आल्याचे त्यांनी येथे सांगितले. कार्यक्रमात चंदू चव्हाण यांनी सांगितलेले प्रसंगामुळे अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला होता. याप्रसंगी वसतिगृहातील विद्यार्थिनींनी त्यांचा सत्कार केला.