रावेर - पंतप्रधान नरेंद मोदी यांनी काश्मीरचे ३७० कलम हटवून धाडसी निर्णय घेतला आहे. याचप्रमाणे भविष्यात पाकव्याप्त काश्मीरवर देखील कब्जा भारत करु शकतो, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी गुरूवारी येथे आयोजित सभेत केले.रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हरिभाऊ जावळे व मुक्ताईनगर मतदारसंघातील भाजप उमेदवार रोहीणी खडसे - खेवलकर यांच्या प्रचारार्थ शहरातील छोरीया मार्केटमधील भव्य प्रांगणात गुरूवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, बेटी बचाओ बेटी पढाओ चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र फडके, खासदार रक्षा खडसे, जि. प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, रावेर पं.स. सभापती माधुरी नेमाडे व यावल पं.स. सभापती पल्लवी चौधरी, जि.प. सदस्या नंदा पाटील, रंजना पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, श्रीराम पाटील उपस्थित होते.यावेळी योगी पुढे म्हणाले, राष्ट्रवादाची चर्चा केली तर महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामींचे स्मरण होते. भगवान प्रभु रामचंद्रांच्या पावन भूमीतून मी आलो असलो तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराज्याभिषेक करतांना तिर्थक्षेत्र काशीचे तीर्थ आणले होते. काशीच्या घाटांना मराठी नावाचे नामकरण आजही आढळून येते. तसेच १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात मराठी सेनेला उत्तर प्रदेशातील स्वातंत्र्यसेनांनींनी खांद्याला खांदा लावून योगदान दिले होते. दरम्यान ३७० कलम रद्द केल्याने तुम्ही प्रयागराज, मुंबईला जेवढ्या सहजपणे जाऊ शकतात तेवढ्याच सहजतेने जम्मु, काश्मिर, अमरनाथ यात्रा एवढेच काय लद्दाखपर्यंत जाऊ शकता, असेही योगी म्हणाले.विकास व राष्ट्रवाद या दोन पैलूंवर हिंदवी स्वराज्य व रामराज्याची नाड जोडून केंद्र व राज्य सरकारच्या विकासाच्या द्रुतगतीचे इंजिन महाराष्ट्रात पुन्हा गतिमान करण्यासाठी भाजप उमेदवारांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.----केळी प्रश्नावर लढा दिलाराज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन वा माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचा कोणताही नामोल्लेख न करता, हरिभाऊ जावळे यांना ’पुराणे - साथीदार’ असा परिचय असल्याचा आवर्जून उल्लेख करत त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकाळात लोकसभेत केळी, कापूस, सिंचनाचे प्रश्नावर त्यांनी अनेकदा लढा दिल्याचे स्पष्ट केले.
... तर पाकव्याप्त काश्मीर देखील भारत काबीज करु शकतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 4:33 PM