भारतातही रेल्वे मार्ग खाजगीत देणे शक्य -
By admin | Published: July 14, 2017 11:56 AM
पंधरा दिवसांचा इटली येथील अभ्यास दौरा आटोपून यादव यांचे येथे आगमन झाले.
ऑनलाईन लोकमतभुसावळ, जि. जळगाव, दि. 14 - : इटली या देशातील रेल्वेच्या धरतीवर आपणही आपल्याकडील रेल्वे मार्ग काही तासांसाठी खाजगी कंपन्यांना व्यावसायासाठी देवू शकतो, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी डीआरएम कार्यालयातील सभागृहात झालेल्या पत्रकार परीषदेत दिली. पंधरा दिवसांचा इटली येथील अभ्यास दौरा आटोपून यादव यांचे आगमन झाले. इटलीतील दौ:यात आत्मसात केलेली माहिती, निरीक्षण रेल्वेच्या सेवेत कसे वापरता येईल याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी सुनील मिश्रा यांनी प्रास्ताविक केले. मालगाडय़ांसाठी स्वतंत्र (फ्रेड कॉरीडोर) मार्ग तयार झाल्यास आपली रेल्वेदेखील ताशी 200 कि. मी. च्या वेगाने धावण्याचे नियोजन करता येऊ शकते,असे त्यांनी सांगितले.भारतीय रेल्वेतील 17 झोन मधून 30 डीआरएम 23 जून रोजी इटलीतील मिलान येथील रेल्वे बिझनेस स्कूलमध्ये पंधरा दिवसांच्या अभ्यासदौ:यासाठी गेले होते. यात मध्य रेल्वेतील भुसावळचे डीआरएम आर.के.यादव आणि नापूरचे डीआरएम ब्रजेशकुमार गुप्ता यांचा समावेश होता. मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे, तसेच मिलॉन हे इटलीचे आर्थिक राजधानीचे शहर आहे. तेथील रेल्वेची बिङिानेस स्कूल जगात टॉपटेन आहे,असे यादव यांनी सांगितले.गेल्या चारपाच वर्षापूर्वी तेथील रेल्वे प्रचंड तोटय़ात होती मात्र त्यांनी हायस्पीड रेल्वे सुरू केली आणि तेथील रेल्वेची आर्थिक सुधारली. मिलॉन ते रोम हे 700 कि.मी.चे अंतर ताशी 300 कि.मी.च्या वेगाने धावणारी गाडी तीन तासात पूर्ण करते. या गाडीचे भाडे विमानापेक्षाही जास्त आहे.पूर्वी विमानसेवेकडे तेथील लोकवळले होते तो ट्राफीक रेल्वेकडे आला आणि रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारली. इटलीतील रेल्वे काही तांसाठी खाजगी कंपन्यांना त्यांचा मार्ग व्यापारासाठी उपलब्ध करुन देत आहे.असे आपणही आपल्याकडे करु शकतो,अशी माहिती यादव यांनी दिली.कर्मचारी संख्या कमी इटलीत कर्मचारी संख्या अत्यंत कमी आहे. मिलॉन ते रोम या 700 कि.मी.मार्गावरील हायस्पीड ट्रेनसाठी तीन हजार कर्मचारी आहेत. सर्व कामे यंत्राच्या सहायाने केली जातात. कर्मचा:यांचा वापर कमी केलाजातो. तंत्रज्ञानात तो देश पुढे आहे. आपल्या रेल्वेत 14 लाख कर्मचारी आहेत,असे त्यांनी सांगितले.आपल्याकडे लोकसंख्या जास्त आहे. तेथे कमी आहे.सिगAल प्रणाली नाहीइटलीत रेल्वेत आपल्यासारखी सिगAल प्रणाली नाही ते रुळावरच कॅप सिगAल आहे.गाडीची गती व ज्या ठिकाणी तिचा थांबा आहे त्याच ठिकाणी ती थांबते त्यामुळे ड्रायव्हरला फारसे काम राहत नाही.प्रवासी सोयी नाहीतआपल्या सारख्या प्रवासी सोयी तिकडे नाहीत. फलाटावर स्वच्छतागृह नाही. फलाटावर शेड नाही.गाडीला दहा मिनिटे असतानाच प्रवाशांना फलाटावर सोडले जाते,अशीही माहिती दिली. प्रसंगी एडीआरएम अरुण धार्मिक व सुनील मिश्रा उपस्थित होते.