जळगाव : जिल्हा पॅरालिम्पिक संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताच्या दहा खेळाडूंनी पदक मिळवले, त्याचा जल्लोष जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आला.
विविध पॅरा क्रीडा स्पर्धेतील विजेते तालुका क्रीडा अधिकारी मार्क धर्माई, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, मोहम्मद आरिफ, सचिव फारुक शेख, खजिनदार प्रभावती चौधरी, सहसचिव शकील शेख, शैलेंद्र पवार, प्रा.डॉ. अनिता कोल्हे, एकलव्य पुरस्कार प्राप्त कांचन चौधरी, मारिय बी, योगिता पाटील जयंत पाटील, अकील खान, तौफिक पिंजारी, मुजाहिद खान, सैयद वाजी, राहुल धुळणकर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अनिता कोल्हे, संजय पाटील यांनी केले. आभार सहसचिव शकील शेख यांनी मानले.