कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित झाल्याने जिल्ह्यातील उद्योग बंद ठेवण्यात आले. यामध्ये मजूरही आपापल्या गावी परतले होते. मात्र अनलॉक होत असताना हळूहळू उद्योग सुरू झाले असून, मजूरही परतले आहेत. त्यामुळे प्लॅस्टिक, खाद्यपदार्थ, डाळ, यांत्रिकी यासह सर्वच उद्योग पूर्वपदावर आले आहेत.
सध्या कच्च्या मालाचाही तुटवडा नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यात पाइप उद्योगासाठी लागणारा कच्चा माल कमी प्रमाणात आयात होत असल्याने त्याचा परिणाम जाणवत आहे. कोरोनामुळे खरेदी क्षमतेवर परिणाम झाल्याने मागणी कमी आहे. नेहमीपेक्षा आता २० ते २५ टक्क्यांनी मागणी घटली असल्याचे सांगण्यात येत आहे.
————————-
जिल्ह्यातील सर्व पाच हजार उद्योग सुरू झाले आहेत. मजूर व कच्चा मालही उपलब्ध होत आहे. उद्योग सुरू झाले असले तरी मागणी मात्र कमी आहे.
- सचिन चोरडिया, सचिव, ‘जिंदा’