हितेंद्र काळुंखेजळगाव : जवळपास गेले २ महिने समान निधी वाटपासाठी सत्ताधारी आणि विरोधी सदस्य एक झाले होते. मात्र सत्ताधारी भाजपाने आपल्या नाराज सदस्यांना खुष करण्यासाठी पदाधिकारी आणि सत्ताधारी गट यांच्यात निधीची समान वाटप केले.यामुळे विरोधकांच्या आवाजात विरोधाचा सुरु मिसळणारे सत्ताधारी सदस्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बाजुने ‘सूर’ ताणला. यामुळे विरोधक एकाकी पडले.गेल्या वेळी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत समान निधी वाटपाच्या मागणीसाठी विरोधकांसह भाजपाचे अनेक सत्ताधारी सदस्यही विरोधात गेल्याने १२० कोटीच्या नियोजनाचा ठराव नामंजूर होण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपावर आली होती. यानंतर भाजपा जिल्हाध्यक्षांनी बोलाविलेल्या ‘समजोता सभेत’ अध्यक्षांसह सर्व सत्ताधारी सदस्यांना समान निधी देण्याचा निर्णय झाला. मात्र विरोधकांच्या तोंडाल पाने पुसली गेली. सत्ताधारी पदाधिकारी आणि सदस्यांना प्रत्येकी ३० लाख तर विरोधकांना केवळ १२ लाखाचा निधी देण्यात आला.बोलण्याच्याही संधी न देणे कितपत योग्यगेल्या सर्वसाधारण सभेत निधीच्या नियोजनाचा विषय बारगळल्यानंतर आपसातील समजोत्यानंतर हा विषय विशेष सभा बोलावून मांडण्यात आला. यावेळी सर्व सत्ताधारी एक झाल्याने हे ११ विषय अवघ्या ५ मिनिटात मंजूर करण्यात आले. यावेळी विरोधकांचे म्हणणेही ऐकूण घेतले नाही. ते ओरडत होते आणि त्याच गोंधळात विषय मंजूर होत गेले.न्यायाचा विषय गेला कोठे?सुरुवातीच्या नियोजनानुसार पदाकिाºयांना अधिक व सदस्यांना कमी.. असे निधीचे वाटप होणार होते. याबाबत विरोधकांनी आवाज उठविल्यावर सत्ताधारी सदस्यांनाही वाढीव निधीच्या आशेने समान निधी वाटपाची मागणी केली. परंतु नंतर सत्ताधाºयांनी आपसात समजोता केल्यावर सत्ताधारी एक झाल्यावर समान निधी हा सत्ताधाºयांपुरताच वाटप झाला. विरोधकांना कमी निधी मिळाला. दरम्यान या आधी समान निधीची मागणी करणाºया सत्ताधारी गटातील सदस्यांनी मात्र स्वत:ला निधी वाढवून मिळाल्याने विरोधकांना कमी निधी देणे म्हणजे असमानच वाटप आहे, याकडे त्यांनी दुर्लक्ष करीत विरोधकांच्या पदरी अन्यायच टाकला.
निधी वाटपात असमानताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 4:44 PM