जळगाव : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे समोर येत आहे़ शनिवार व रविवार दोन टप्प्यातील अहवालानुसार शहरात २१ नवे रुग्ण आढळून आले असून ग्रामीण भागातही शिरसोलीत पाच तर आव्हाणे येथील एका ३२ वर्षीय तरूणाचा अहवाला पॉझिटीव्ह आला आहे़ यात रविवारी एकाच दिवसात शहरात ९ तर तालुक्यात सहा नवीन रुग्ण आढळून आले आहेत़शहराची रुग्णसंख्या १६३ वर पोहचली आहे़शिरसोलीच्या बाधिताच्या संपर्कातील काही लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या़ त्यांचे अहवाल रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पालिका प्रशासनाला प्राप्त झाले़यात पाच जण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत़ हे पाचही जण आधीच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल होते़आव्हाण्यात उपाययोजनाआव्हाणे येथील ३२ वर्षीय एका इन्शुरन्स प्रतिनिधीला कोरोनाची बाधा झाल्याचे रविवारी समोर आले आहे़ या तरूणाला काही दिवसांपूर्वी टायफाईड झाला होता़ कोविड रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे़ गावात तात्काळ आरोग्य यंत्रणेने उपाययोजना राबवून कंटेमेंट झोन निश्चित केले आहे़ तरूणाच्या घराच्या परिसराहस आजुबाजुच्या काही गल्ल्यांही प्रतिबंधीत घोषित करण्यात आल्या असून लोक रिस्क कॉन्टॅक्टच्या हातांवर शिक्के मारून त्यांना होम क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत़एकाच कुटुंबातील १२ जणनवल कॉलनीत एकाच कुटुंबातील १२, गेंदालाल मील परिसरात एक ५३ वर्षीय पुरूष, पोलीस लाईन येथील एक महिला, शाहू नगर एक पुरूष, सम्राट कॉलनी एक पुरूष यासह ढाकेवाडीतील ५० वर्षीय महिला, पांडूरंगनगर ३९ वर्षीय महिला व १४ वर्षीय मुलगा, वाल्मिकनगर ४२ वर्षीय पुरूष, निमखेडी शिवार एक पुरूष असे रुग्ण रविवारी आढळून आले आहेत़
जळगाव शहरासह तालुक्यात संसर्ग वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 12:53 PM