जळगाव : शहरातील खोटे नगरमधील एका सोसायटीसह शहरातील वेगवेगळ््या भागात ११ नवीन रुग्ण आढळून आलेले आहेत़ शहरातील एकूण रुग्णसंख्या १०८ वर पोहचलेली आहे़ रविवारी शिवाजीनगर ३ व सम्राटकॉलनी, अक्सानगर, सालारनगर, जुने जळगाव, सुप्रिम कॉलनी, शाहू नगर, कंजरवाडा, खोटेगनर या भागांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत़शिवाजीनगर भागातील बाधित रुग्णाच्या संपर्कातील एक ४५ वर्षीय व ३८ वर्षीय पुरूष व १५ वर्षांची मुलगी यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले़ रात्री उशिरा वैद्यकीय पथक या ठिकाणी पोहचले होते़या ठिकाणी पथकाला बराच वेळ लागला. यासह कंजरवड्यातील एका ६५ वर्षीय वृद्धाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर हा परिसर सील करण्यात आला. मात्र, आरोग्य यंत्रणा रात्री उशिरापर्यंत या भागात पोहचली नव्हती़यासह सुप्रिम कॉलनीतील ४८ वर्षीय पुरूष हा पूर्वीच्या बाधिताच्या संपर्कातील आहे़ रात्री उशिरापर्यंत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची कामे सुरू होती़लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : शहरातील खोटे नगरमधील एका सोसायटीसह शहरातील वेगवेगळ््या भागात ११ नवीन रुग्ण आढळून आलेले आहेत़ शहरातील एकूण रुग्णसंख्या १०८ वर पोहचलेली आहे़ रविवारी शिवाजीनगर ३ व सम्राटकॉलनी, अक्सानगर, सालारनगर, जुने जळगाव, सुप्रिम कॉलनी, शाहू नगर, कंजरवाडा, खोटेगनर या भागांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत़शिवाजीनगर भागातील बाधित रुग्णाच्या संपर्कातील एक ४५ वर्षीय व ३८ वर्षीय पुरूष व १५ वर्षांची मुलगी यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले़ रात्री उशिरा वैद्यकीय पथक या ठिकाणी पोहचले होते़या ठिकाणी पथकाला बराच वेळ लागला. यासह कंजरवड्यातील एका ६५ वर्षीय वृद्धाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर हा परिसर सील करण्यात आला. मात्र, आरोग्य यंत्रणा रात्री उशिरापर्यंत या भागात पोहचली नव्हती़यासह सुप्रिम कॉलनीतील ४८ वर्षीय पुरूष हा पूर्वीच्या बाधिताच्या संपर्कातील आहे़ रात्री उशिरापर्यंत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची कामे सुरू होती़कंजरवाडा येथील ६५ वर्षीय वृद्ध हे त्यांच्या पत्नीसह काही दिवसांपूर्वी कामानिमित्त पुणे येथे गेले होते़ परतल्यानंतर त्यांना त्रास जाणवायला लागल्याने तीन दिवसांपासून ते कोरोना रुग्णालयात दखल होते़ शुक्रवारी त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते़ त्यानंतर रविवारी त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला़ त्यानंतर या परिसरात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात आली व पत्रे लावून परिसर सील करण्यात आला़नमुना नसल्याने गोंधळस्थानिक प्रयोगशाळेतून शनिवारी ३२ तपासणी अहवाल प्राप्त झाले होते़ त्यात १४ अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले. मात्र, यात एकही रुग्णाचा पत्ता देण्यात आला नव्हता़ यामुळे प्रशासनाचा गोंधळ उडाला होता़ रविवार दुपारपर्यंत हे पत्ते तपासणी सुरू होती़ अखेर डेप्युटी सीईओ कमलाकर रणदिवे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली़ अखेर त्यांनी प्रयोगशाळेला पूर्ण नमुना दिला व हा पत्त्यांचा घोळ मिटला़स्थानिक प्रयोगशाळेतून ३९ अहवालजळगावच्या प्रयोगशाळेत तपासणी सुरू झालेली असून दोन दिवसात या ठिकाणी ७१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली़ यात पहिल्या दिवशीच ३२ तर दुसऱ्या दिवशी ३९ तपासणी अहवाल प्राप्त झाले़शिवाजीनगरचा घोळ मिटलाभुसावळ येथून स्वॅब घेतलेल्या एका व्यक्तिचे तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर या रुग्णाने शिवाजीनगर पत्ता दिला होता़ हे शिवाजी नगर जळगावचे असल्याची माहिती जळगाव महापालिकेच्या यंत्रणेला मिळाली, मात्र, या रुग्णाचा पत्ताच आढळत नसल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली़ अखेर दुसºया दिवशी हा रुग्ण भुसावळच्या शिवाजीनगरातील असल्याचे समोर आले़ निवासाच्या पत्त्यांच्या घोळामुळे प्रशासनाची तारांबळ व डोकेदुखी वाढत असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत़बँकेत नोकरीखोटेनगरात इंद्रनिल सोसायटीत आढळून आलेला ४२ वर्षीय रुग्ण हा एका बँकेत कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे़ याच ठिकाणी त्यांना लागण झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे़खासगी वाहनाने प्रवासबालाजी मंदिरामागच्या परिसरात रहिवास असलेला १९ वर्षीय तरूण हा २० रोजी खासगी वाहनाने मुंबई येथून परतला होता़ त्याला ताप व कफ असल्याने त्याने तपासणी केली असता त्याचे अहवाल रविवारी सायंकाळी पॉझिटीव्ह आढळून आला आहे़
खोटेनगर, कंझरवाड्यात कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 1:08 PM