लोकमतन ऑनलाईन वाकोद ता. जामनेर : या परिसरात मोठय़ा क्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिकावर मिलीबग आणि लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतक:यांमध्ये प्रचंड चिंता व्यक्त होत आहे. जुलै महिन्याच्या शेवटी काढता पाय घेतलेल्या पावसाने 20 ते 25 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुनरागमन केल्याने बळीराजाने पै अन् पै जोडलेला पैसा लावून हातातून जात असलेला खरीप हंगाम वाचविण्यात मोठी मदत मिळाली. यंदा शेतकरी वर्गाने शेती मशागतीपासून तर बी-बियाणे, औषधी, खते आदींवर मोठा खर्च करून आपली सर्व गुंतवणूक शेतात केलेली होती़ तथापि पावसाने दडी मारल्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जातो, की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असतांना पुन्हा पाऊस परतल्याने काही प्रमाणात का होईना शेतकरी वर्गाची मेहनत व पैसे वाचल्याची चिन्हे दिसत असतांना आता त्यावर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. त्यात मिलीबग आणि लाल्या यांचे संकट मोठे आहे. आधीच खंडित पावसामुळे कपाशी, मका, सोयाबीन या पिकांच्या उत्पादनात घट येणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर आता आलेल्या पावसाने या पिकांना जीवदान मिळाल आहे, परंतु रोगाच्या प्रादुर्भावाने उभ्या पिकांचे भवितव्य खराब असल्याचे चित्र वाकोदसह परिसरात दिसत आहे. या परिसरात कपाशी पिकांची लागवड प्रचंड प्रमाणात असून मुख्य पिक म्हणून कपाशीची लागवड केलेली असते. मात्र या कपाशीवर थ्रिप्स, मिलीबग व लाल्या रोगाने तसेच झाडावरील रस शोषक किडीने मोठ्या प्रमाणावर थैमान घातलेले असून शेतकरी वर्ग कमालीचा हैराण झालेला दिसून येत आहे. नेमकी काय उपाययोजना करावी या संभ्रमात तो पडला आहे. काय आहे मिलीबग ? कपाशीच्या झाडावर शेंडयापासून ते जमिनीलगतच्या खोडापर्यत पांढ:या रंगाच्या अत्यंत बारीक किडीचा प्रादुर्भाव असतो. यामुळे पाने गळणे , कै:यांची वाढ खुंटणे, तसेच झाडांची पाने पिवळी व लाल पडून झाड वाळणे किंवा काळवंडतात. यातून उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. जोरदार पावसाची प्रतिक्षा गत आठवडय़ात चांगला पाऊस झाला. या पावसाने पिके तरली, मात्र पाऊस पाहिजे तसा जोरदार नसल्याने उभ्या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. उत्पन्नात घट येणार हे निश्चित झाले आहे. यापूर्वी पावसाने दडी मारल्याने चवळी, मूग, उडीद, मका पिकांवर परिणाम होऊन ही पिके शेतक:यांच्या हातातून निघून गेल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे कापसावरील रोग कमी होण्यासाठी जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.
कपाशीवर मिलीबगसह ’लाल्या’चा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 10:20 PM
जळगाव जिल्हय़ातील वाकोद ता. जामनेर परिसरात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देलहरी पावसामुळे खरीप हंगामाविषयी जीवाला घोर लागलेल्या शेतक:यांवर दुसरे संकट उशीरा येऊन बरसलेल्या पावसाच्या आनंदावर विरजण