शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

घरी बसेन पण भाजपात कदापी जाणार नाही, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची पत्रपरिषदेत माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 10:54 PM

सत्ता असो वा नसो, मी कायम राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असून माझी पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावरच निष्ठा आहे.घरी जरी बसलो तरी भाजपात कदापीही जाणार नाही, असे स्पष्टीकरण माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पत्रपरिषदेत केले.

जळगाव, दि. २५ - सत्ता असो वा नसो, मी कायम राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असून माझी पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावरच निष्ठा आहे.घरी जरी बसलो तरी भाजपात कदापीही जाणार नाही, असे स्पष्टीकरण माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पत्रपरिषदेत केले.सोमवारी सायंकाळी आकाशवाणी चौकातील त्यांच्या संपर्क कार्यालयात पत्रपरिषद झाली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विलास भाऊलाल पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, महानगराध्यक्ष नीलेश पाटील, युवक अध्यक्ष विशाल देवकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.देवकर हे भाजपाकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते, असे विधान अमळनेर येथे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी नुकतेच केल्याने देवकर हे भाजपात जातात की काय? अशी चर्चा पसरल्याने त्यांनी आपली भूमिका मांडली.खडसेंनी पूत्र विशालला देवू केलेली उमेदवारी नाकारलीपक्षाने आपल्याला कमी कालावधीतच मंत्रीपद दिले होते. पक्षाचे तसेच पवार परिवाराचे आपल्यावर उपकार आहेत, हे मी विसरु शकत नाही. विधानसभा निवडणुकीत खडसे यांनी पूत्र विशाल देवकर यांना उमेदवारी देवू केली होती मात्र पक्षाच्या एकनिष्ठतेमुळे आपण ती नाकारली.पक्षनिष्ठेमुळे भाजपाची खासदारकीची आॅफर नाकारलीगेल्या नव्हे तर त्या पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीसाठी आपणाला भाजपाकडून विचारणा झाली मात्र राष्ट्रवादी काँग्रेसवरील निष्ठेमुळेच आपण तेव्हाही ती आॅफर नाकाराली. परंतु विरोधक नेहमीच आपल्या बाबत वेगवेगळ्या अफवा पसरवत असतात, असेही गुलाबराव देवकर म्हणाले.मनपात राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्याची शक्यतामनपा तसेच पुढील विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने नवीन कार्यकारिणीसह जोमाने कामास लागणार असून राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी आताही विश्वासाने आपणावर ही जबाबदारी सोपविल्याचेही देवकर यांनी सांगितले. मनपात खाविआसोबत लढयाचे की नाही याचा निर्णय वरिष्ठ घेतली परंतु पक्षाच्या धोरणानुसार राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढेल असा निर्णय होवू शकतो, असा अंदाजही त्यांंनी व्यक्त केला.विशाल यांच्या ऐवजी दुस-यास संधी मिळावी!पक्षाने पूत्र विशाल देवकर यांना शहर युवक अध्यक्षपदाची विश्वासाने जबाबदारी टाकल्याचा आनंदच आहे मात्र मी पूर्णवेळ राजकारणात असल्याने विशाल हे संस्थेचे कामकाज पाहत असल्याने त्यांना पदाच्या कामासाठी पक्षास वेळ देणे अवघड आहे, म्हणून ही संधी दुसºयास देण्याची श्रेष्ठींना विनंती करणार आहे. यावर ते जो आदेश देईल तो मान्यच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान नोटबंदी, जीएसटी, महागाई, फसवी शेतकरी कर्जमाफी आदीमुळे जनता सध्या भाजपा सरकारवर नाराज असून याचा लाभ काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होणार आहे. राष्ट्रवादी सर्वाधिक जागा घेईल, असा विश्वासही देवकर व्यक्त केला.

टॅग्स :BJPभाजपा