ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.28- गावठी व देशी-विदेशी दारू विक्रेत्यांविरूद्ध शनी पेठ पोलिसांनी बुधवारी कारवाईची मोहीम राबवली. ङिापरु अण्णा नगर व वाल्मिक नगरात झालेल्या धाडसत्रात सरला संतोष पवार व राजेंद्र नारायण सोनवणे या दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 18 हजार रुपये किमतीची दारु जप्त करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले यांनी पोलीस ठाण्याचा पदभार घेतला. या हद्दीत गावठी व देशी दारू अवैधरित्या विक्री केली जात असल्याची तक्रार त्यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार वाडिले यांनी पोलीस उपनिरीक्षक पवन राठोड, मिलिंद कंक, नरेंद्र ठाकरे, अमित बाविस्कर, गणेश गव्हाळे, अनिल धांडे, सुनिता इंधाते यांना सोबत घेत ङिापरु अण्णानगर व वाल्मिकनगरात छापा टाकला. सरला संतोष पवार ही महिला अवैधरित्या गावठी दारू विक्री करता असतांना मिळून आली. तिच्याजवळ 12 हजार 600 रुपये किंमतीच्या 6 कॅन गावठी दारू तसेच 3 हजार 500 रुपया किंमतीच्या देशी दारूच्या 69 बाटल्या मिळून आल्या. वाल्मीक नगरात राजेंद्र नारायण सोनवणे हा तरुण गावठी दारू विक्री करताना मिळून आला. त्याच्याजवळून 3 हजार रुपये किंमतीची दोन कॅन गावठी दारू जप्त करण्यात आली.