शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

निरागसपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 12:24 AM

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये निरागसपणा दर्शविणारे काही प्रसंग सांगताहेत युवा लेखिका रश्मी विलास गायकवाड.

उजव्या हाताच्या हनुवटीला आधार देवून मी एका लहानशा रेस्टॉरंटमध्ये निशांतची वाट बघत बसले होते. तो येईल या आशेने मी रेस्टॉरंटच्या दरवाजाकडे मान वळवली. तो आला नाही, पण इवलीशी पावले आली. ज्यांनी पिसासारखा मुलायम स्वेटर आणि दोन वेण्या असलेली कानटोपी घातली होती. साधारणत: तीन ते पाच वर्षांच्या दोन जुळ्या गोंडस मुली होत्या त्या.त्यांच्या आईसोबत येऊन बसल्या त्या दोघी. त्यांच्या आईने त्यांच्यासाठी आॅर्डर दिली, तेवढ्यात माझा चहाही आला. आतुरतेने वाट पहाणारे त्यांचे टपोरे डोळे आणि त्यांच्या चेहऱ्यातून वाहणारं निरागसपण मी माझ्या गरम चहाच्या घोटबरोबर पित होते. वेटरने लवकरच त्यांनी आॅर्डर केलेल्या गरमागरम मसालाडोसा टेबलवर मांडला. इवलीशी जिवणी व चावत असलेला प्रत्येक घास. तो गोजिरवाणा क्षण मी माझ्या मनाच्या कप्प्यात कैद केला. कायमचा.माझ्या चहाचा रिकामा झालेला कप वेटरने उचलला आणि जाता जाता त्यांनी संपवलेल्या डिशेसही घेऊन गेला. नाजूक गुलाबी ओठावरचा थेंब पुसून ती इवलीशी पावलं लुटूलुटू दरवाजाच्या दिशेने जावू लागली आणि टोकदार नोक असलेले सॅण्डलस् घालून दोन पावलं पुन्हा रेस्टॉरंटमध्ये आली. सगळे येत होते पण निशांत येण्याचे एकही चिन्ह दिसत नव्हते.‘अजून काही घेणार का मॅडम?’मी शांतपणे म्हटलं,‘वेटींग फॉर समवन’!‘ओके मॅडम’, तो म्हणाला.इच्छा नसताना माझं लक्ष त्या दोन तरुणींकडे वळलं. त्यांचं आचकट विचकटपणे सेल्फी काढणं आणि वेडं-वाकडं तोंड करून किंवा जीभ बाहेर काढून काढलेल्या फोटोचं तोंडभरून कौतुक करणं जरा विचित्रच वाटलं. मी दुर्लक्ष केलं आणि निशांत कुठे अडकला असेल याचा विचार करत राहिले. अचानक माझ्या कानांनी काहीतरी ऐकलं आणि मी त्या शब्दांकडे ओढले गेले. काही विषय किंवा काही शब्द असे असतात की, ते कितीही दूर असले तरी बरोबर ऐकू येतात. तसेच काही हे शब्द होते.पहिली म्हणाली,‘उसने बोला, आय लाईक यू!फ्रेंडशिप करोगी क्या मुझसे?’दुसरी म्हणाली,‘फिर तुमने क्या कहाँ?’‘वैसे तो कुछ खास नही था उसमेंपर फिर सोचा की, फ्रेंडशीप करलुंगीतो मेरे बॅलेन्स और नेटपॅक काखर्चा बच जाएगा । इसलिए मैनेहाँ बोल दिया!’‘तू तो एक नंबर की चालू है!’आणि एकमेकींना टाळी देत दोघी हसू लागल्या. मग माझ्या मनात सहजच एक विचार डोकावला. दहा-बारा वर्षांपूर्वी ह्यासुद्धा तशाच निरागस, गोड आणि गोजिरवाण्या असतील ना? पण शिक्षण, समाज, मोबाइल आणि संगत यांनी त्यांना पूर्णपणे बदलून टाकलं आहे. कुठे हरवलं आहे त्यांच्यातलं निरागसपण? आणि जरी निरागसपण टिकवता नाही आलं त्यांना तरी सुसंस्कृतपणा जपायला हवाच हवा.आणि त्या जुळ्या गोंडस मुली, त्यांचं काय? आयुष्यात घडणाºया वेगवेगळ्या घटनांमुळे, प्रगतीमुळे, संगतीमुळे त्या पण अशा बदलतील का? की वेळीच संस्काराचे मध पाजून त्यांना सावरता येईल, खूप मोठं बनवता येईल? धुरकट दिसणाºया मेनुकार्डकडे बघत माझे विचारचक्र सुरू होते.विचाराचं गणितच असं असतं की, त्यांचं गणित मांडता येत नाही. एकदा का विचारांची साखळी सुरू झाली की ती थांबता थांबत नाही. एका बिंदूला अस्पष्ट दिसणारा मेनुकार्ड स्पष्ट दिसला आणि मागे खुर्र्चीला टेकत मी मोठा सुुस्कारा टाकला. आणि समोर बघते वर काय? हाताची पहिली दोन बोटं गालावर ठेवून ऐटीत निशांत माझ्याकडे टक लावून बघत होता. त्याने घातलेला निळसर रंगाचा शर्ट आणि त्यावर काळ्या रंगाचं चकाकणारा जॅकेट यामुळे त्याचे व्यक्तिमत्त्व आज अधिकच आकर्षक वाटत होते.मी आश्चर्याने म्हटलं,‘अरे तू कधी आलास?’‘तेव्हाच जेव्हा तू गाढ चिंतनात रमली होतीस.’मी भुवया वर खेचत आणि मान हलवत म्हणाले,‘ ओह आय सी!’तो किंचित हसला; पण मी थोडं चिडूनच म्हटलं,‘आणि काय रे किती उशीर करतोस?’गेल्या तासभर मी वाट बघते आहे तुझी.’‘सॉरी पुन्हा नाही करणार.’‘हे तू नेहमीच म्हणतोस.’तो प्रश्नार्थक आवाजात म्हणाला,‘ते सोड. मी आलो तेव्हा तू एवढा कसला विचार करत होतीस? ते सांग.’‘काही नाही, थोडक्यात एवढंच सांगते की, एक नवीन स्टोरी भेटली इथे, त्याचाच विचार करत होते.’कॉलर टाईट करत आणि गर्वात तो म्हणाला,‘अगं राणी तुला स्टोरी मिळावी म्हणून तर मी खास उशिरा येतो. फक्त तुझ्यासाठी!’मी डोळे वर करून विचारलं,‘हो का शहाण्या?’एक डोळा मारत आणि मिश्किल हसत तो म्हणाला, ‘हो ना!’मीही हसले आणि माझ्या डोळ्यात साठवत गेले, त्याच्या गोड हास्यातलं ‘निरागसपण...’-रश्मी विलास गायकवाड