ऑनलाइन लोकमतभुसावळ, जि. जळगाव, दि. 29 - महाजनकोच्या दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्रात नेमणुकीचे बनावट कागदपत्र सादर करुन तब्बल 9 जणांनी नोकरी मिळवून प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणाच्या चौकशीस शनिवारपासून प्रारंभ झाला. तालुका पोलीस ठाण्याचे परीविक्षाधीन पोलीस अधिकारी मनीष कलवनिया यांनी पथकासह आज दीपनगर येथील प्रशासकीय विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे विचारपूस केली.या प्रकरणी दीपनगरचे प्रशासकीय अधिकारी एकनाथ बोरोले यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसात दिनेश रमेश पाटील, अनिल आत्माराम पाटील, उमेश संजय पाटील, हर्षल दिलीप भामरे, रवींद्र श्रावण पाटील, विजय दिलीप पाटील, संदीप देविदास पाटील, भूषण साहेबराव माळी, चंद्रशेखर साहेबराव पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या प्रकरणात पोलीस अद्यापही कागदपत्रांची छाननी करीत आहेत. ज्या नऊ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी जी बोगस कागदपत्र सादर करून नोकरी मिळविण्याचा प्रयय्न केला ती कागदपत्र येथील प्रशासन विभागाकडे आलीच नाहीत. त्यामुळे प्रशासनाने पोलिसात रितसर फिर्याद देऊन या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावावा, अशी आमची फिर्याद असल्याचे बोरोले म्हणाले.पोलीस आज आले होते.त्यांनी कागदपत्रांबाबत विचारपूस केली, असे ते म्हणाले. युडीसी योगेश पाटील 5 एप्रिलपासून गैरहजर आहे. त्याच्याकडे संबंधित विभागाची जबाबदारी आहे. त्याचा या प्रकरणातील सहभागाबाबत प्रशासनाकडे कोणतीही माहिती नाही. पोलीस तपास करीत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
दीपनगर बोगस नोकर भरती प्रकरणाची चौकशी सुरू
By admin | Published: April 29, 2017 6:08 PM