जामनेर, जि.जळगाव : नाशिक येथील सराफाचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अहिर सुवर्णकार समाजातर्फे करण्यात आली आहे. पदाधिकारी व समाजाच्या वतीने २८ रोजी जामनेर येथे तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले.नाशिक येथील प्रसिद्ध सराफ व्यापारी विजय बुधूशेठ बिरारी यांना हैद्राबाद पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाण व त्यात त्यांचा झालेला संशयास्पद मृत्यू याप्रकरणी दोषी हैद्राबाद पोलिसांना अटक करून सत्य बाहेर आणावे व हैद्राबाद पोलिसांवर व त्यांच्यासोबत असलेल्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा व त्यांच्या दुकानातून घेऊन गेलेली रोक रक्कम व दागिने त्यांच्या परिवारास परत करावे व या प्रकरणाची सी.आय.डी.मार्फत चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.यावेळी अध्यक्ष प्रदीप विसपुते, विजय दुसाने, दीपक बाविस्कर, सुधाकर सराफ, संतोष सराफ, नरेंद्र सराफ, जगदीश सोनार, किशोर दुसाने, सुहास जडे, दिलीप सराफ, अनिल सोनार, गोकुळ सोनार, मुकेश दंडागव्हाल, सुरेश दुसाने, सागर सोनार, कैलास सोनार, सतीश बिरारी, देवानंद सोनार, विश्वेश जाधव, मंगेश सोनार, बाळा सोनार, नंदू विसपुते, संदीप विसपुते, भिका विसपुते, बापू विसपुते, भावेश भामरे, मनोज दुसाने, कुणाल निकुंभ, डॉ.मनोज विसपुते, सुनील देवरे, शेखर बाविस्कर, दिलीप भामरे, रुपेश बाविस्कर, पद्माकर सराफ आदी उपस्थित होते.
सराफा मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 10:06 PM
नाशिक येथील सराफाचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अहिर सुवर्णकार समाजातर्फे करण्यात आली आहे.
ठळक मुद्देजामनेर येथे अहिर सुवर्णकार समाजातर्फे तहसीलदारांना निवेदनसीआयडी चौकशी करण्याची मागणी