जळगाव : नागरिकांकडून स्वच्छतेचा कर घेतला जात असताना शहरात स्वच्छतेचे तीनतेरा झाल्याने मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मंगळवारी शिवसेना नगरसेवकांनी जळगाव महापालिकेच्या प्रवेशव्दारासमोरच साखळी उपोषण सुरु केले आहे. यावेळी शिवसेना नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी प्रशासन व सत्ताधाºयांविरोधात ‘सबका साथ म्हणत शहर केले भकास, ‘झाली पहिजे, झाली पाहिजे स्वच्छता झाली पाहिजे’, ‘अंदर की बात है, महापौर अपने साथ है’ अशा जोरदार घोषणांनी मनपा परिसर दणाणून सोडला.गेल्या आठवड्यात शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर मनपा आरोग्य विभागाच्या कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन केले होते. मात्र, त्यावेळी उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी चार दिवसात शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिल्यानंतर जोशी यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, चार दिवसातही परिस्थिती न बदल्यामुळे मंगळवारी सकाळी १० वाजता अनंत जोशी व नितीन बरडे यांनी मनपाच्या प्रवेशव्दारासमोरच बसून आंदोलनाला सुुरुवात केली. यात साखळी उपोषणाचा निर्णय नगरसेवकांनी घेतला.महापौर, उपायुक्तांनी घेतली भेटमहापौर भारती सोनवणे व उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून समस्या ऐकून घेत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच उपायुक्तांना याबाबत तत्काळ उपाययोजना करण्याचा सूचना दिल्या. उपायुक्त दंडवते यांनीही आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनपाकडून केवळ आश्वासन दिले जात असून प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. स्वच्छतेचा कर नागरिकांवर लादला, स्वच्छता करणे सोडून शहर भकास करण्याचेच मनपाने ठरविल्याचे जोशी यांनी सांगितले. सत्ताधाºयांनी शहराला बेवारस केल्याचाही आरोप त्यांनी केला.‘अंदर की बात है महापौर अपने साथ है’शिवसेना नगरसेवकांकडून आंदोलनस्थळी घोषणाबाजी सुरु असतानाच महापौर भारती सोनवणे व नगरसेवक कैलास सोनवणे यांचे आगमण झाल्यानंतर सेना नगरसेवकांनी ‘अंदर की बात है, महापौर अपने साथ है’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर काही भाजप नगरसेवकांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.अन्य नगरसेवकांचाही पाठिंबा...सकाळी १० वाजता जोशी व बरडे यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली.त्यानंतर ११ वाजेनंतर शिवसेनेच्या इतर पदाधिकारी व नगरसेवकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. दुपारी १२ वाजता नगरसेवक नितीन लढ्ढा, गणेश सोनवणे, शिवसेना माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, माजी नगरसेवक नितीन सपके, नितीन महाजन, मंगला बारी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले.
अंदर की बात है, महापौर साथ है
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 12:17 PM