भुसावळ : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसुविधा चांगल्या पद्धतीने मिळतात की नाही याची खातरजमा करण्यासाठी तसेच त्यामध्ये त्रुटी असतील तर त्यावर उपाययोजना करण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या पीएसी समिती पथकाने शुक्रवारी सकाळी भुसावळ रेल्वे स्थानकाला भेट दिली व विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या सुविधांना प्राधान्य द्यावे, अशी सूचनाही केली.यात्री सुविधा समितीचे (पीएसी) अध्यक्ष पी. के. कृष्णदास, सदस्य सी. रविचंद्रण, प्रेमेन्द्र रेड्डी, हिमाद्री बल, डॉ. अजितकुमार, डॉ. राजेंद्र फिरके, काकू विजयालक्ष्मी, परशुराम महतो, यांच्यासोबत भुसावळ रेल्वे विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता, एडीआरएम मनोज कुमार सिन्हा, मंडल वाणिज्य प्रबंधक अरुण कुमार, वरिष्ठ मंडळ अभियंता (समन्वयक) राजेश चिखले, वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक डॉ. स्वप्नील नीला, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजयकुमार, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अनिल बागले यांनी समिती सदस्यांसोबत सुविधांबद्दल चर्चा केली.रेल्वे पोलिसांची बैठक आढळली अव्यवस्थितपीएसी कमिटीचे (यात्री सुविधा समिती) भुसावळ रेल्वे स्थानकावर सकाळी १० वाजता आगमन झाले. दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांनी रेल्वे स्थानकावरील सर्व फलाटांची पाहणी केली. यात त्यांनी पाणी सुविधेचा दर्जा तपासला. फलाट क्रमांक ५ जीआरपी बुथ जवळ जाऊन सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून विचारणा केली. या ठिकाणी रेल्वे पोलिसांची बैठक व्यवस्थित नसल्याचे निदर्शनास आले, ती व्यवस्थित करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या. रेल्वे प्रवाशांना प्रत्यक्षात भेटून त्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा बाबत समाधानी आहात का याबाबत विचारणा केली व अजून काय अपेक्षा आहे याबाबतही चर्चा केली.डीआरएम, आमदारयांच्यासोबत चर्चारेल्वेस्थानकाची पाहणी केल्यानंतर पथकाने डीआरएम कार्यालयात मोर्चा वळविला व तेथे उच्चपदस्थ अधिकारी डीआरएम विवेक कुमार गुप्ता तसेच आमदार संजय सावकारे यांच्यासोबत चर्चा केली.
रेल्वे पथकाकडून भुसावळ स्थानकावर पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 8:32 PM