वडजी, ता. भडगाव: तालुक्यात गिरणा पट्टयात ११ जून रोजी झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी केळीबागा जमिनदोस्त झाल्या. बऱ्याच ठिकाणी घरांची पडसड झाली. घरावरील छताचे पत्रे उडाले. दुष्काळी परिस्थीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. नुकसानीची तीव्रता लक्षात घेत जिल्हयाचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी मुंबईहुन थेट येत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.भडगाव तालुक्यातील वडजी, पांढरद, पिचर्डे, बात्सर या गावांना त्यांनी भेटी दिल्या. वडजी येथील कांतीलाल परदेशी, सुनिल नेरपगार यांच्या नुकसानग्रस्त केळी बागाची पाहणी केली. यावेळी दिलीप पाटील, अशोक पाटील व इतर शेतकºयाच्या व्यथा समजून घेतल्या. निसवाड झालेल्या केळीबागांबरोबर नुकसान झालेल्या कांदेबागेचेही सरसकट पंचनामे करावेत असे महसुल विभागाला आदेश दिलेत व नुकसानग्रस्त शेतकºयांना पंचनाम्यानुसार तात्काळ मदतीसाठी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करु असे आश्वासन दिले.पांढरद येथिल योगेश पाटील यांच्या केळी बागेच्या झालेल्या नुकसानाची पालकमंत्र्यांनी चौफेर पाहणी केली. पिचर्डे येथील मधुकर निंबा पाटील यांच्याही बागेची पाहणी केली व पिचर्डे गावातील नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. यावेळी येथिल शेतकºयांनी पिकविमा संदर्भात मंत्र्यांना निवेदन दिले. बात्सर येथिल योगेश पाटील या शेतक?्यांयांची केळीबागेची पाहणी केलीयावेळी त्यांच्यासोबत जिल्हा अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, भडगाव तहसिलदार गणेश मरकड, भडगाव पं. स. सभापती रामकृष्ण पाटील, माजी जि.प. सदस्य श्रावण लिंडायत, भाजपा तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील, संजय पाटील, अमोल शिदे, डॉ. संजीव पाटील, भडगावचे नगराध्यक्ष अतुल पाटील, मच्छिंद्र पाटील, अमोल पाटील, अनिल पाटील वडजी सरपंच सुनिल जैन, राजेंद्र कुमार मोरे, राणधिर पाटील, वडजी, पांढरद, पिचर्डे बात्सर येथिल शेतकरी उपस्थित होते.वडजी येथे नुकसानग्रस्त केळी बागांची पाहणी करताना पालकमंत्री गिरीष महाजन तसेच पदाधिकारी आणि शेतकरी.
गिरणा परिसरातील नुकसानग्रस्त केळीबागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 6:35 PM