यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी, गणेश सोनवणे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, चंद्रकांत कापसे, मनपा अधिकारी अरविंद भोसले, बाबा साळुंखे, अमृत मक्तेदाराचे प्रतिनिधी पंकज बऱ्हाटे उपस्थित होते.
जलकुंभावर पाणी उपसा आणि पाणी वितरणासाठी आवश्यक असलेले विद्युत पंप बसविण्याचे काम पूर्ण झाले असून, विद्युत रोहित्र बसविण्याचे काम सुरू आहे. शनिवारी महापौरांनी या कामाच्या पाहणीवेळी जलकुंभाच्या संपूर्ण परिसराला लवकरात लवकर संरक्षक भिंत उभारावी आणि मुख्य जलवहिनीला सुप्रीमची जलवाहिनी जोडण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, येत्या १५ फेब्रुवारीला गणेश जयंती असून, गणेश जयंतीच्या मुहूर्तावर सुप्रीम कॉलनीत अमृतचा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असून, त्या दृष्टीने हे काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही महापौरांनी केल्या.