शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

मंगळवारपासून मुख्याध्यापक, शिक्षकांना शाळेत नियमित उपस्थित राहण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 9:17 PM

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप शाळा सुरू झालेल्या नसल्या तरी आॅनलाईन शिक्षण सुरू आहे़ मात्र, आता जिल्हा परिषद शाळांमधील ...

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप शाळा सुरू झालेल्या नसल्या तरी आॅनलाईन शिक्षण सुरू आहे़ मात्र, आता जिल्हा परिषद शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांनी मंगळवार, २५ आॅगस्टपासून नियमित शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचन जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केल्या आहेत़ तसे आदेश सोमवारी काढले आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मार्च महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्यासह जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या़ त्यात परीक्षाही रद्द झाल्या़ चार महिने उलटून देखील कोरोना संसर्ग कमी न झाल्यामुळे शाळा आजही बंद आहेत़ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून आॅनलाईन पध्दतीने शाळा मात्र सुरू झालेल्या आहेत़ दरम्यान, सोमवारी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने मंगळवारपासून जिल्हा परिषद शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक यांना नियमित शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत़ तर शाळेच्या नेहमीच्या वेळेप्रमाणे पूर्ण वेळ शाळेत थांबून आॅनलाईन, आॅफलाईन तसेच समुह, गटपध्दतीने शिक्षण प्रक्रिया सुरू करावी, असेही शिक्षण विभागाच्या आदेशात म्हटले आहे़अहवाल तयार होणारमुख्याध्यापक व शिक्षक शाळेत आल्यानंतर शिक्षकांच्या उपस्थितीचा व शिक्षण प्रक्रिया सुरू झाल्याचा अहवाल तयार केला जाणार आहे़ तो अहवाल केंद्र प्रमुख शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना, त्यानंतर शिक्षण विस्तार आधिकारी गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात येईल, अशाही सूचना केल्या आहेत़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव