चोपडा : गेल्या पंधरवड्यात थंडीने निचांक गाठला असून जवळपास पाच ते सहा सेल्सियस तापमानाची नोंद चोपडा तालुक्यात करण्यात आली आहे. थंडी जास्त असल्याने तालुक्यातील केळी उत्पादक शेतकºयांना त्याचा फटका बसलेला आहे. हजारो हेक्टर क्षेत्रातील केळी बाधीत झालेली आहे. मात्र ज्या शेतकºयांनी केळी पीक विमा रक्कम भरलेली असेल अशांना हवामानावर आधारित केळी विमा भरपाई मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. चोपडा, धानोरा, अडावद,गोरगावले,चहार्डी लासूर या मंडळातील पात्र शेतकºयांना केळी पीक विम्याचा फायदा होईल त्यासाठी मात्र हवामान मापन करणारे यंत्र कृषी विभागाकडून अद्ययावत असणे आवश्यक आहे .हेक्टरी ५० हजार रुपये मिळावे -इंदिराताई पाटीलदरम्यान, शासनाकडून केळी पीक विमा प्रती हेक्टर ३३ हजार रुपये देण्याची तरतूद असून या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे ही तरतूद प्रती हेक्टरी ५० हजार रुपये करावी अशी मागणी जिल्हा बँकेच्या माजी व्हाईस चेअरमन तथा शिवसेनेच्या नेत्या इंदिराताई पाटील यांनी केली आहे. तसेच अति थंडीमुळे चरका हा रोग केळीवर पडला त्यामुळे हजारो हेक्टर केळीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे . कृषी आणि महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून शासनाने त्वरीत मदत द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
चोपडा तालुक्यातील अति थंडीमुळे बाधित केळी उत्पादकांना विम्याचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 1:44 AM
थंडी जास्त असल्याने तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसलेला आहे. हजारो हेक्टर क्षेत्रातील केळी बाधीत झालेली आहे. मात्र ज्या शेतकºयांनी केळी पीक विमा रक्कम भरलेली असेल अशांना हवामानावर आधारित केळी विमा भरपाई मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.
ठळक मुद्देहजारो हेक्टर क्षेत्रातील केळी बाधीत हेक्टरी ५० हजार रुपये मागणी