आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२१: मृत्यू नंतर बनावट पॉलिसी काढण्यासाठी बनावट कागदपत्र पुरविल्याच्या प्रकरणात अडावद पोलिसांनी मंगळवारी सूर्यकांत उर्फ सनी सुभाष बाटुंगे (वय २६ रा.तांबापुरा, जळगाव) याला जळगाव शहरातून अटक केली. फकिमा सुभेदार तडवी (रा.कुंड्यापाणी, ता.चोपडा) यांनी पतीच्या मृत्यूनंतर बनावट दाखला सादर करुन दलालांमार्फत विमा पॉलीसी काढली होती. याप्रकरणी हरीद्वार रामविलास सैनी (रा.नवीन भगवान नगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरुन अडावद पोलीस स्टेशनला ८ डिसेंबर २०१७ रोजी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात फकीमा यांनाही आरोपी करण्यात आले आहे. या गुन्ह्यात मंगळवारी प्रतिम रमेश मेने (वय २८ रा.भुसावळ), अजयसिंग शिवभरणसिंग राजपूत (वय २९रा.सतना, मध्य प्रदेश) व सूर्यकांत याला अटक करण्यात आली. तपासाधिकारी गजानन राठोड यांचे पथक जळगावात आले होते.
जळगाव जिल्ह्यात पतीच्या मृत्यूनंतर काढली विमा पॉलीसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 9:34 PM
मृत्यू नंतर बनावट पॉलिसी काढण्यासाठी बनावट कागदपत्र पुरविल्याच्या प्रकरणात अडावद पोलिसांनी मंगळवारी सूर्यकांत उर्फ सनी सुभाष बाटुंगे (वय २६ रा.तांबापुरा, जळगाव) याला जळगाव शहरातून अटक केली.
ठळक मुद्देतीन दलालांना केली अटकअडावद पोलिसात पत्नीलाही केले आरोपीजळगाव शहरातून घेतले एकाला ताब्यात