सेवाग्राम एक्सप्रेसला जादा डबे जोडण्याची मागणी
जळगाव : जळगाव मुंबईकडे जाणाऱ्या पहाटेच्या सेवाग्राम एक्स्प्रेसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र,जनरल डब्यांना प्रचंड गर्दी असल्यामुळे अनेक प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने या गाडीला जादा डबे जोडण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
स्टेशनवरील नळातून पाण्याची गळती
जळगाव : रेल्वे स्टेशनवर बसविण्यात आलेल्या अनेक ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या तोट्या खराब झाल्यामुळे त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याची नासाडी होत असल्यामुळे, रेल्वे प्रशासनाने या नळांची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
दादऱ्यावरून वापर सुरू
जळगाव : रेल्वे स्टेशनवर दादरा उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, कोरोनामुळे उद्घाटनाचे काम रखडले आहे. परंतु, प्रवाशांनी उद्घाटनापूर्वीच दादऱ्यावरून वापर सुरू केला आहे. स्टेशनच्या आत-बाहेर अनेक प्रवासी या दादऱ्याचा व सरकत्या जिन्यांचा वापर करत आहेत.
जतूंनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी
जळगाव : शहरातील नवीपेठेत अनियमित साफसफाईअभावी मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तरी मनपा प्रशासनाने या परिसरात
जतूंनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयात व्याख्यान
जळगाव : चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालयात सायकॉलॉजिस्ट व व्यसनमुक्ती चळवळीचे प्रणेते नितीन विसपुते यांचे व्याख्यान नुकतेच उत्साहात पार पडले. त्यांनी वेबिनारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना ताण-तणाव, व्यवस्थापन, मानसिक आरोग्य, आरोग्याची काळजी या विषयी मार्गदर्शन केले.