शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
2
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
3
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
4
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
5
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
6
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
7
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
8
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
9
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
10
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
12
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
13
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
14
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
15
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
16
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
17
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
18
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
19
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

७७ वर्षांच्या सीएमव्हीचा प्रसार करणाऱ्या ६० किडी व त्यांच्या आश्रयाच्या ८०० वनस्पतींचे एकात्मिक कीड नियंत्रण गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 12:38 AM

जगातील कृषी वा केळी संशोधन करणाºया कोणत्याही संशोधन केंद्रात सीएमव्हीला प्रतिरोध करणारे केळीचे वाण विकसित करण्यासंदर्भात संशोधन नाही.

ठळक मुद्देलोकमत संडे स्पेशल मुलाखतशासनमान्य प्रयोगशाळा त्या वारंवार आलेले नमुने प्रमाणित करण्यास असक्षमआंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ डॉ.के.बी.पाटील यांचे मत

किरण चौधरीरावेर : १९४३ पासून सुमारे ७७ वर्षांचा इतिहास असलेल्या कुक्कुंबर मोझॅक व्हायरसचा प्रसार करणाºया ६० प्रकारच्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण व त्यांना आश्रय देणाºया ८०० प्रकारच्या वनस्पतींचे नीट व्यवस्थापन करणे हेच सीएमव्ही नियंत्रणाचे गमक असल्याने जगातील कृषी वा केळी संशोधन करणाºया कोणत्याही संशोधन केंद्रात सीएमव्हीला प्रतिरोध करणारे केळीचे वाण विकसित करण्यासंदर्भात संशोधन करण्याची तसदी घेतली नसल्याचे मत आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ डॉ.के.बी.पाटील यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.प्रश्न : सीएमव्हीचा प्रादुर्भाव केळीवर पहिल्यांदा कुठे व केव्हा झाला?उत्तर : सीएमव्हीचा प्रादुर्भाव पहिल्यांदा १९४३ मध्ये आढळला. तब्बल ७७ वर्षांचे जीवनमान असलेल्या सीएमव्हीचा प्रादुर्भाव भारतात मोठ्या प्रमाणात आढळला होता. त्यावेळी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेतर्फे नियंत्रणाची व्यापक मोहीम राबविण्यात आली होती. तद्नंतर १९७४ मध्ये गुजरात मधील सुरत, भरूच व रामपिपल्या या जिल्ह्यात आढळला होता. सन १९८० साली भारतात ७० टक्के सीएमव्हीचा प्रादुर्भाव आढळल्याचा अहवाल विषाणू तज्ज्ञ डॉ.सुमनवार यांनी शासनाकडे सादर केला आहे. तद्नंतर सन २००२, २००३, २०१५ व २०१९ साली चापोरा, दापोरा व रावेर तालुक्यातील केळी बागांमध्ये आढळला.प्रश्न : सीएमव्हीने बाधित खोडं उपटून फेकावे लागत असल्याने असे नेमके कोणते दुष्परिणाम आढळतात?उत्तर : सीएमव्ही विषाणू झाडात शिरला म्हणजे केळीच्या पानाच्या शिरा पिवळ्या व पांढºया पडून त्यावर काळे ठिपके पडू लागतात व नवीन येणारी पाने चिरोटी निघू लागतात. ढगाळ व झिमझिम पावसानंतर तापमानात वाढ होऊन पोषक वातावरण निर्माण झाले तरी केळीचे खोडं चांगली पानं काढू लागतात. म्हणून शेतकºयाचा गैरसमज होतो की सीएमव्ही नियंत्रणात आला.मात्र त्याच ठिकाणी फसगत होते. सीएमव्हीने बाधित खोड निसवल्यानंतर वापसी केळीपेक्षाही निकृष्ट घड निसवत असल्याने शेतकऱ्यांचा खर्च व मेहनत व्यर्थ ठरते. म्हणून सीएमव्हीचे लवकरात लवकर शोध घेऊन त्या खोडांना उपटून फेकणे, रसशोषक किडींचे एकात्मिक कीड नियंत्रण करणे, शिवार तणमुक्त करते व रसशोषक किडींचे आश्रयस्थान असलेल्या पिकांवर वेळीच एकात्मिक किड नियंत्रण करणे आवश्यक आहे.प्रश्न : अत्याधुनिक केळी उत्पादनाचे तंत्रज्ञान अंमलात आणले जात असताना व जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र असताना सीएमव्हीवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरल्याबाबत आपणास काय वाटते?उत्तर : मूळात केळीवर अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित असले तरी जगाच्या पाठीवर असलेल्या कोर्बाना, इतिहब, बायोव्हर्सिटी इंटरनॅशनल, आयबीआयके, इंब्राफब्राड यासारख्या कृषी वा केळी संशोधन करणाºया आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थांनी सीएमव्हीला रोगप्रतिकार करणाºया केळीच्या वाणांचे संशोधन करण्यासाठी शक्ती वाया घातली नाही. कारण, या विषाणूचा प्रसार पाण्यातून वा जमिनीतून होत नसल्याने या रोगाचे व्यवस्थापन सोपे आहे. व्हायरस इंडेक्स केलेली रोपांची लागवड केल्यास, तणविरहीत शिवार ठेवल्यास व सीएमव्हीचा प्रादुर्भाव करणाºया ६० किडींचे एकात्मिक कीड नियंत्रण केल्यास व त्यांना आश्रय देणाºया २०० वनस्पतींचे एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्यास सीएमव्हीवर नियंत्रण ठेवणे सोपे आहे.प्रश्न : उतीसंवर्धित केळी बागांवर देशी वाणांच्या बेणे लागवडीखालील केळी बागांपेक्षा सीएमव्हीचे प्रमाण जास्त असल्याने केळीरोपांची निर्मिती करणाºया कंपन्या नुकसानीला जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. आपले मत काय?उत्तर : सन १९६५ मध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या सर्व्हेक्षणात ९ हजार ४० हेक्टर केळी बागांपैकी हेक्टर १ हजार ४५० क्षेत्रातील बसराई व हरीसाल वाणांच्या केळीबागा बळी पडल्याचे निष्पन्न झाले होते. डिसेंबर २०१५ व जानेवारी २०१६ मध्ये जामनेर तालुक्यातील हिवरखेडा, नेरी, पहूर येथील बेणे लागवडीखालील १४० केळीबागा बाधित झालेल्या आढळून आले होते. मध्य प्रदेशातील चापोरा, दापोरा, फोफनार भागातील उतीसंवर्धित केळी बागांएवढाच प्रादुर्भाव कंद लागवडीखाली बागांवर दिसतो. बेणे वा कंद लागवडी खालील केळीच्या खोडाचे बीजांकुरण होताना नाही तर तीन चार कोवळ्या पानांवर आल्यावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यासाठी अनुकूल वातावरण लाभले म्हणजे हा विषाणू रोपाखालील की बेणे लागवडीखालील केळीबागा आहे याबाबत कोणताही भेदभाव करीत नाहीत. तो शेतकरी बांधवांचा गैरसमज आहे.प्रश्न : विषाणू निर्देशांकाबाबत शासनाने नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे व शासनाकडून काय अपेक्षा आहेत?उत्तर : उतीसंवर्धित केळी रोपांची निर्मिती करताना ती १०० टक्के विषाणू निर्देशांंकाने प्रमाणित करणे शासनाने अनिवार्य केले आहे. किंबहुना त्यानुसार विषाणू निर्देशांंकाने रोपांना शासनाच्या शासनमान्य प्रयोगशाळेतून प्रमाणित करण्यात येते. मात्र शासनाने निर्धारित केलेल्या या प्रयोगशाळांमधून अत्यावश्यक त्या काळातच रोपनिर्मिती करणाºया कंपन्यांनी पाठवलेल्या चाचणीचे नमुन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात येत असल्याने व त्या शासनमान्य प्रयोगशाळा त्या वारंवार आलेले नमुने प्रमाणित करण्यास सक्षम नसल्याने संबंधित प्रयोगशाळांची क्षमतावर्धित करण्याची गरज आहे. केंद्र सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाने त्रिची येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या सर्वोच्च संस्थेतील विषाणू निर्देशांकाने प्रमाणित करणाºया प्रयोगशाळेची रद्दबातल केलेली मान्यता कायम करण्याची गरज आहे. कृषी विद्यापीठ तथा जळगाव केळी संशोधन केंद्रात विषाणूंचा शोध घेणे, विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव करणाºया किडींचा शोध घेणारे संशोधन करण्यासाठी बळकटीकरण करण्याची गरज असल्याचे मत डॉ.के.बी.पाटील यांनी व्यक्त केले.

टॅग्स :interviewमुलाखतRaverरावेर