जळगाव : सुप्रिम कॉलनीतील गणेशनगरातील एका ४८ वर्षीय प्रौढाचा कोरोना तपासणी अहवाल रविवारी सायंकाळी पॉझिटीव्ह आला़ हा रुग्ण आधीच बाधिताच्या संपर्कातील असल्याने क्वारंटाईन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली़रविवारी आढळून आलेल्या रुग्ण व त्याचे नातेवाईक आधीच क्वारंटाईन होते़ तरीही या परिसरात जावून महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने रविवारी सायंकाळी पाहणी केली़ दरम्यान या बाधित रुग्णांच्या संपर्कातील ११ व्यक्तींना अभियांत्रिक महाविद्यालयाच्या वसतीगृहात ारंटाईन करण्यात आले आहे.कोरोनामु्क्तअमळनेरच्या कोरोना बाधित तीन रुग्णांना कोरोना रुग्णालयातून तर १७ रुग्णांना अमळनेरच्या कोविड सेंटरमधून रविवारी घरी सोडण्यात आले़गेंदालाल मिल परिसरात दिलासागेल्या काही दिवसांपासून शहरात सातत्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात होती़ त्यातच गेंदालाल मिल परिसरतील एक महिला कोरोना बाधित झाल्याने महिलेच्या नातेवाईकांसह संपर्कातील ८ लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते़ या नमुन्यांचे अहवाल रविवारी सायंकाळी प्राप्त झाले असून सर्व अहवाल निगेटीव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे़ यात एका खासगी डॉक्टरांचाही समावेश आहे़
बाधिताच्या संपर्कातील प्रौढाला बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 12:48 PM