जळगाव : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संशोधन आणि विकास कक्षामार्फत “तंत्र शिक्षण गुणवत्ता सुधार कार्यक्रम” प्रायोजित अभियांत्रिकी शास्त्र आणि तंत्रज्ञानामधील उदयोन्मुख कल यावरील आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच पार पडली. यावेळी प्रा. डॉ. देवेंद्र चौधरी यांनी देशाच्या आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणे यावर भर दिला.
संशोधन व नाविन्यता यासोबत मूलभूततेतून सद्य:स्थितीतील संगणक आणि आज्ञा प्रणालीचा विकास, याकरीता देशातील विविध उच्चस्तरीय समित्यांमधील राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय सहभाग, याबाबत उत्तराखंड तंत्र विद्यापीठाचे कुलगुरु, प्रा. डॉ. नरेंद्र चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र कोकाटे हे होते. यावेळी अमेरीकेत उच्च शिक्षणाच्या तसेच नोकरीच्या संधी याबाबत अमेरिकास्थित तज्ञ विलास साळगांवकर यांनी दूरस्थ संवाद साधत सहभागींचे शंका निरसन केले. समाधान कुलकर्णी यांनी आभार मानले.