लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या शिक्षक पुरस्कारांसाठी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या विद्यानिकेतन शाळेत मुलाखती घेण्यात आल्या. यंदा ३३ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यातून प्रत्येक तालुक्यातून एक अशा १५ प्रस्तावांची निवड होणार आहे. मंगळवारी पुरस्कारासाठी पात्र शिक्षकांची अंतिम यादी अंंतिम मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविली जाणार आहे. दरम्यान, गेल्यावर्षीही कोरोना संसर्गजन्य स्थितीमुळे या पुरस्कारांचे वितरण झालेेले नाही. यामुळे येत्या सोमवारी शिक्षकदिनी या दोन्ही वर्षांतील पुरस्कारांचे वितरण एकत्र करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेकडून केले जात आहे.
जि. प. अध्यक्षा रंजना पाटील, समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एस. अकलाडे, उपशिक्षणाधिकारी डी. एम. देवांग यांनी या मुलाखती घेतल्या. सकाळी १० वाजेपासून मुलाखतींना सुरुवात झाली होती. दुपारी या मुलाखती संपल्या.