पहूर, ता. जामनेर - राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा पहूर यांच्यावतीने शनिवारी आठवडे बाजार परिसरात आयोजित वधू-वर परिचय मेळाव्यात १३० तरुण-तरुणींनी परिचय करून दिला.या मेळाव्याच्या अध्यक्षथानी भुसवळच्या नगरसेविका सरिता तायड़े होत्या. जळगाव, औरंगाबाद, बुलढाणा, मालेगाव, कल्याण, मुंबई, नाशिकसह बºहाणपूर येथून विवाहोच्छूक तरुण-तरुणी व पालक उपस्थित होते. समाजाचे जिल्हाध्यक्ष गलूबाबा ठोसर, डॉ. संपत वानखेडे, जामनेर तालुकाध्यक्षा सिंधू सुरडकर, डी. बी. मोरे, खंडू काकडे, गणेश राउत, ज्ञानदेव वानखेडे, अॅड. अर्जुन वानखेडे, राष्ट्रवादीचे संजय गरुड, माजी सरपंच प्रदीप लोढा, शैलेश पाटील, विवेक जाधव, माजी जि.प. सदस्य कैलास पाटील, उपसरपंच रवींद्र मोरे, अमृत वानखेडे, कवी विश्वनाथ वानखेड़े, मधुकर आग्रे, किरण खैरनार आदी उपस्थित होते.यावेळी अमृत वानखेडे यांनी संत रोहिदास भवनासाठी दोन लाख रूपयांची देणगी जाहीर केली. यावेळी समाजाच्यावतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला. मेळाव्यात साठ तरुणी तर ७० तरुणांनी परिचय दिला . तालुकाध्यक्ष डॉ. जितेंद्र वानखेडे, किशोर वानखेडे, रमेश शेकोकर, विजय सुरलकर, चिंतामण लोखंडे, कैलास भारुडे, युवराज वानखेडे, बालू वानखेडे, भगवान वानखेडे, नीलेश वानखेडे, किरण चिमकर यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन जितेंद्र वानखेडे यांनी केले व प्रास्ताविक अशोक सुरवाड़े यांनी केले. माजी मुख्याध्यापक प्रल्हाद वानखेडे यांनी आभार मानले.
पहूर येथे १३० तरुण-तरुणींनी दिला परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 9:52 PM