भुसावळ, जि.जळगाव : येथे प्रथमच लिंगायत कोष्टी समाजातर्फे राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा झाला. यात महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यातून सुमारे १७६ इच्छुकांनी आपला परिचय करून दिला.होणाऱ्या जीवनसाथीबद्दल सर्वांना माहिती असावी व ती सर्वांनी समजून घ्यावी तसेच कौटुंबिक माहिती व्हावी, समाजात जागृती व्हावी, मेळाव्यानिमित्त समाजबांधवांनी एकत्र यावे या उद्देशातून भुसावळ येथील लोणारी समाज मंगल कार्यालयात रविवारी लिंगायत कोष्टी समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा घेण्यात आला. यात १२३ उपवर मुले तर ५३ उपवर मुली अशा १७६ उपवरांनी नोंदणी करून आपला परिचय करून दिला.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ.राजेंद्र सेवलकर होते. उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, नगरसेवक राजेंद्र नाटकर, निर्मल कोठारी, अॅड.बोधराज चौधरी, गिरीश महाजन, अमोल इंगळे, परिक्षित बºहाटे उपस्थित होते.प्रथमच राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आल्यामुळे मेळाव्यास समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. औरंगाबादच्या सेवानिवृत्त शिक्षिका बेबीबाई पवार, ज्योती रत्नपारखे, बळवंत घोडके, सतीश काळे, मनोज गारकर, अतुल काटे यांच्यासह महाराष्ट्रातील कानाकोपºयातून तसेच गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आदी राज्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.समाजातील नवयुवक युवती अनेक क्षेत्रामध्ये नेत्रदीपक कामगिरी करीत आहे याची माहिती अनेक वेळा होत नाही. परिचय मेळाव्यानिमित्त अनेक युवक-युवती उच्चपदावर असल्याची माहिती समाज बांधवांना यानिमित्त मिळाली. उपवर वधू-वरांनी शैक्षणिक तसेच इतर सामाजिक कोणत्या ठिकाणी सेवेस कार्यरत आहे आदींबाबतची व कौटुंबिक माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवलकर यांनी समाजबांधवांना एकवटण्याचे आवाहन केले.सूत्रसंचालन लीना पवार, माधुरी गरुड यांनी केले. सोनाली कोष्टी यांनी परिचय करून दिला, तर आभार सोनाली कोष्टी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माधव गरुडे, विनय कोष्टी, दीपक कोष्टी, मुकेश कोष्टी, सतीश घोडके, अमोल कोष्टी, दीपक पवार यांच्यासह समा बांधवांनी परिश्रम घेतले.
भुसावळ येथे लिंगायत कोष्टी समाजाच्या मेळाव्यात १७६ इच्छुक वधू-वरांनी दिला परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:37 PM
प्रथमच लिंगायत कोष्टी समाजातर्फे राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा झाला. यात महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यातून सुमारे १७६ इच्छुकांनी आपला परिचय करून दिला.
ठळक मुद्देमहाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश कर्नाटकातील उपवर-वधूंची हजेरीप्रथमच मेळावा झाल्याने समाजबांधवांची लक्षणीय उपस्थिती