भुसावळ, जि.जळगाव : येथील रेल्वेस्थानकावर अनेक दिवसांपासून सुरू असलेले नवीन फलाटांच्या उभारणीचे कार्य आता संपले असून, नवीन फलाटांची ओळख फलाट क्रमांक एक व दोन अशी होणार आहे.२४ रोजी नवीन फलाट खुले होणार असून, या फलाटावरून जाण्याचा मान मुंबई किंवा सुरत पॅसेंजरला मिळणार आहे. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर व ज्या कामासाठी वेळोवेळी रेल्वेतर्फे मेगाब्लॉक घेण्यात आले अशा भुसावळ रेल्वे स्थानकावरील दोन नवीन फलाटचे क्रमांक १ व २ आज दिले जाणार असून प्रवाशांसाठी २४ रोजी सकाळी मुंबई पॅसेंजर किंवा सुरत पॅसेंजर या फलाटावरून धावेल. नवीन फलाटामुळे प्रवाशांची गर्दी कमी होईल व तासन्तास आऊटरवर व यार्डामध्ये ताटकळत उभ्या असलेल्या प्रवासी गाडांना आता फलाटावर येण्यास विलंब लागणार होणार नाही.नवीन फलाटांमुळे रेल्वेस्थानकांवरील फलाटाच्या क्रमांकात बदल होणार असून, नवीन फलाटांनाना क्रमांक १ व २ असे दिले जाणार आहे. जुन्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ ला ३ असे क्रमांक देण्यात येईल, तर जुना फलाट क्रमांक २ हा बंद करण्यात आला आहे. फलाट क्रमांक ३ ला ४, फलाट ४ ला ५, फलाट क्रमांक ५ बदलून ५-अ असे क्रमांक देण्यात येईल.फलाट क्रमांक ६,७, ८ या फलाटांच्या क्रमांकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सुमारे ५० कोटी खर्च करून नवीन फलाटांची उभारणी झाली आहे. अत्याधुनिक सोयीसुविधा यानुसार नवीन फलाट उभारणी करण्यात आले आहे.नवीन फलाटांमुळे प्रवाशांची गर्दी कमी होईल व गाड्यांना स्थानकावर यायला जास्त विलंब लागणार नाही.
भुसावळ रेल्वेस्थानकावरील नवीन फलाटांची १ व २ क्रमांकाने ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:26 PM
भुसावळ येथील रेल्वेस्थानकावर अनेक दिवसांपासून सुरू असलेले नवीन फलाटांच्या उभारणीचे कार्य आता संपले आहे.
ठळक मुद्देफलाट उभारणीचे काम पूर्णनवीन फलाट २४ रोजी खुले होणारनवीन फलाटांमुळे प्रवाशांची गर्दी कमी होईलगाड्यांना स्थानकावर यायला जास्त विलंब लागणार नाही