गुढे, ता.भडगाव, जि.जळगाव : रस्ता रुंदीकरणात एरंडोल-येवला या राज्य मार्गावर अवैध वृक्षतोड होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.सूत्रांनुसार, एरंडोल राज्यमार्ग मंजूर होऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. रस्त्यावर असलेल्या दुतर्फा झाडे तोडण्यासाठी ठेका देण्यात आलेला आहे. तरी या ठेकेदारांनी कोळगाव (ता.भडगाव) गावापासून झाड तोडण्यास सुरुवात केली आहे . रस्त्यापासून सहा मीटर हद्दीतील वृक्ष तोडण्याचा अधिकार ठेकेदाराला असताना या ठेकेदारांनी सहा मीटरपुढील थेट आठ मीटरपर्यंत मोठे डोलदार झाडांची कत्तल सुरू केली आहे. ठेकेदार रात्री-बेरात्री भल्या पहाटे रस्त्यावरील झाडांची तोड करत असतो. पहिले झाड कोळगाव गावालगत विठ्ठल रुक्मिणी नगरमधून आठ मीटरच्या पुढे आंब्याचे हिरवेगार झाड अवैधरित्या तोडून घेऊन गेले. दादाभाऊ रमेश पाटील यांच्या शेतातील मधुकर नारायण पाटील, आधार आनंदा पाटील, गोविंदा मन्साराम न्हावी, संतोष बळीराम महाजन या शेतकºयांच्या शेती हद्दीतील मोठमोठ्या डेरेदार झाडांची कत्तल संबंधित ठेकेदाराने केली आहे, असा आरोप होत आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग भडगाव येथील शाखा अभियंता वीरेंद्र राजपूत यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित ठेकेदाराला अगोदर आठ मीटरपर्यंत झाडे तोडण्याची परवानगी होती. परंतु रस्ता बारा मीटरचा झाला आहे. त्यामुळे ठेकेदाराला फक्त सहा मीटरपर्यंत झाड तोडण्याबाबत सूचना दिल्या आहेत. ठेकेदाराला सहा मीटरच्या पुढील झाडे न तोडण्याबाबत सूचना केल्या आहेत. प्रत्येक सहा मीटरच्या आतील झाडांना खुणा (मार्क) असलेले झाड आमच्या माणसांसमक्ष तोडण्याबाबत सांगण्यात आले आहे.
एरंडोल-येवला राज्य मार्गावर अवैध वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 12:01 AM
रस्ता रुंदीकरणात एरंडोल-येवला या राज्य मार्गावर अवैध वृक्षतोड होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
ठळक मुद्देकोळगाव येथील प्रकारठेकेदाराबद्दल शेतकऱ्यांची तक्रार