ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.9 - गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल विभागातील विद्यार्थी अनिरूद्ध इंगळे, रोहित चौधरी, स्वाती पाथरवट, माधुरी महाजन, ईश्वर पाटील यांनी औद्योगीक वसाहतीत एसएमएम व आरदुो सर्कीटच्या साहाय्याने निरीक्षण व नियंत्रण यासाठी प्रकल्प विकसित केला आहे. हा वीज व्यवस्थापनाबाबतचा आविष्कार असून, त्याचे संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, प्राचार्य व्ही.जी.अराजपुरे, प्रवीण फालक यांनी कौतुक केले आहे.
औद्योगीक वसाहतीमध्ये या प्रकल्पामुळे वीज व्यवस्थापन करणे सहज शक्य आहे. याची संकल्पाना व्ही.एस.पाटील व अभियंता हेमंत सोनवणे यांनी मांडली होती. विद्याथ्र्याना अतुल ब:हाटे, महेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.