आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १ - मृत्यू हे अंतिम सत्य आहे. जन्म आणि मृत्यू कोठे आणि केव्हा येईल हे विधात्या शिवाय कुणालाही सांगता येत नाही. जन्म आणि मृत्यूचे हे कोडे समजणे कठीण आहे. मात्र काहींच्या मृत्यूनंतरही काही प्रश्नांचे न उकलणारे कोडे निर्माण होते. मनोहर विठ्ठलभाई पटेल (६५) यांच्या मृत्यूनंतरही असेच कोडे निर्माण झाले. या वृद्धाचा आठ महिन्यांपूर्वी मृत्यू झाल्यानंतरही त्यांचे वारस पुढे येत नसल्याने ‘वारस मिळेल का वारस’ अशी आर्त साद जळगाव पोलीस घालत आहेत. वारसांअभावी त्यांच्या बँक खात्यातील त्यांच्या ७ लाख रकमेचा व इतर वस्तूंचा तिढा कायम आहे. कुणीच समोर न आल्यास ही रक्कम शासन जमा होण्याची शक्यता आहे.दुखी मन मेरे, सुन मेरा कहनाजहाँ नही चैना, वहाँ नही रहना...अपने लिए कब हैं ये मेले, हम हैं हर एक मेले मे अकेलेक्या पाएगा उस में रह कर, जो दुनिया जीवन से खेलेसाहिर लुधियानवी यांनी जीवनात एकाकी असलेल्या व्यक्तीच्या मनस्थितीचे वर्णय या गीतात केले आहे. गेल्या २५ वर्षांपासून कुटुंब आणि आप्तस्वकियांपासून दूर राहून एकाकी जीवन जगणारे मनोहर पटेल हे अनेक वर्षांपासून जळगावात वास्तव्याला होते. सुरुवातीचे काही वर्ष बॉम्बे लॉज आणि त्यानंतर गोकुळ लॉजवर त्यांचा मुक्काम होता. या दरम्यान आठ महिन्यांपूर्वी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.तीन दिवसांनंतर मनपाकडून अंत्यसंस्कारउदरनिर्वाहासाठी पासपोर्ट एजंटचे काम करणाऱ्या मनोहर पटेल यांच्या अकस्मात मृत्यूनंतर शहर पोलिसांकडून त्यांच्या वारसांचा शोध सुरु झाला. तीन दिवस मृतदेह ठेवल्यानंतर कुणीही वारस पुढे न आल्याने पोलिसांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून पटेल यांच्यावर अंत्यसंस्कार केले. वारसांबाबत काही माहिती मिळावी यासाठी ते राहत असलेल्या खोलीतील कागदपत्रांची तपासणी केली.पोलिसांची वारसाच्या शोधासाठी गुजरातवारीमनोहर पटेल हे गुजराथी असल्याने सुरुवातीला पोलिसांनी जळगावातील काही गुजराथी बांधवांकडे त्यांच्या वारसांबाबत चौकशी केली. मात्र त्यानंतरही काही माहिती न मिळाल्याने हवालदार बळीराम तायडे व सहकाºयांनी अहमदाबाद, आनंद, सुरत याठिकाणी जाऊन वारसांचा शोध घेतला. आठ महिन्यांनंतरही वारस मिळत नसल्याने पोलीस देखील हतबल झाले आहेत....तर रक्कम व साहित्य शासन जमा होणारतपासाधिकारी यांनी अकस्मात मृत्यूचा अहवाल सादर केल्यानंतर वारसाच्या शोधासाठी अजून संधी देण्यात येईल. मात्र त्यानंतरही कुणी पुढे न आल्यास पटेल यांच्या खात्यावर जमा असलेली रक्कम तसेच त्यांच्या अंगावरील सोने, त्यांची दुचाकी ही शासन जमा करण्याचे आदेश प्रातांधिकारी देऊ शकतात.कागदपत्रांवर केवळ पटेल यांचेच नावपोलिसांना तपासणी दरम्यान बँकेचे पासबुक, मोपेड दुचाकीचे कागदपत्रे तसेच वाहन चालविण्याचा परवाना आढळून आला. पासबुकमध्ये किमान सात लाखांच्या रकमेची नोंद मिळून आली. पोलिसांनी बँकेत जावून वारसाची नोंदबाबत चौकशी केली. मात्र सर्वकागदपत्रांवर पटेल यांचे नाव आढळून आले.गेल्या आठ महिन्यांपासून आम्ही मनोहर पटेल यांच्या वारसांचा शोध घेत आहोत. मात्र आजपर्यंत कुणीही वारस समोर आलेले नाहीत. त्याबाबत प्रातांधिकारी यांच्याकडे अहवाल पाठविण्यात येईल. प्रातांधिकारी आदेश करतील त्यानुसार पटेल यांच्या बँक खात्यावरील रक्कम व वस्तूंबाबत निर्णय घेण्यात येईल.-बळीराम तायडे, तपासाधिकारी, शहर पोलीस स्टेशन, जळगाव.
आठ महिन्यांपासून वारसाचा शोध लागेना, तपास न लागल्यास ७ लाखाची रक्कम होणार शासनजमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 12:50 PM
मनोहर पटेल मृत्यूप्रकरण
ठळक मुद्देतीन दिवसांनंतर मनपाकडून अंत्यसंस्कारपोलिसांची वारसाच्या शोधासाठी गुजरातवारी