बोदवड, जि.जळगाव : तालुक्यातील साळशिंगी येथील शुभांगी सीताराम सोनवणे या २५ वर्षीय अविवाहित तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी तपास थंड बस्त्यात आहे. संशयित शिक्षक असल्याची चर्चा आहे.शुभांगी सोनवणे या तरुणीने २० मे रोजी राहत्या घरात उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. याआधी या तरुणीला बोदवड येथे खासगी रुग्णालयातही उपचारार्थ हलविण्यात आले होते. सुरुवातीला याबाबत बोदवड पोलिसांना माहिती नव्हती. नंतर तपास सूत्रे हलविल्यानंतर माहिती समजली. जळगाव येथील रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. यानंतर जळगाव पोलिसांनी हा गुन्हा बोदवड पोलिसात वर्ग केला आहे.बोदवड पोलिसांनी शुभांगीचा व्हिसेरा पुढील तपासासाठी धुळे व नाशिक येथे पाठविला आहे. यानंतर पुढील तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र या प्रकरणामध्ये शुभांगी जामनेर येथे एम.ए.च्या परीक्षेला जात होती. त्यावेळेस एक शिक्षक मित्र तिच्यासोबत असल्याचे काहींनी पाहिल्याची शहरात चर्चा आहे.दरम्यान, जामनेर येथील एका परीक्षा केंद्राजवळ आत्महत्येपूर्वी शुभांगी व मित्र शिक्षकाला पाहण्यात आल्याची माहिती एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.याबाबत या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी दीपक ढोमणे यांनी आम्ही चौकशी करीत असल्याचे सांगितले.
शुभांगीच्या आत्महत्येप्रकरणी तपास थंड बस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 7:34 PM
साळशिंगी येथील शुभांगी सीताराम सोनवणे या २५ वर्षीय अविवाहित तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी तपास थंड बस्त्यात आहे.
ठळक मुद्देसंशयित शिक्षक असल्याची चर्चाउंदीर मारण्याचे औषध प्राशन करून केली होती आत्महत्या