जळगाव : नालासोपाऱ्यातून जप्त केलेल्या स्फोटकांप्रकरणी साकळी (ता. यावल) येथील किरण निंबादास मराठे (३०) याची बुधवारी एटीएसने चौकशी केली. चौकशीनंतर रात्री त्याला सोडून दिले आहे. दरम्यान, आणखी काही तरुण एटीएसच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.एटीएसने पकडलेला साकळीतील हा ुतिसरा आरोपी आहे. गेल्या वर्षी साकळीमध्ये नवरात्रौत्सवात झालेल्या दंगलीत किरण आरोपी आहे. बुधवारी कोर्टाच्या सुनावणीसाठी आला असताना एटीएसने त्याला पकडले. साकळीतील वासुदेव सूर्यवंशी व विजय लोधी यांना या प्रकरणी आधीच अटक केली आहे.जालन्यात एकाची चौकशीमाजी नगरसेवक श्रीकांत पांगरकर हा जालन्यात आनंदीनाथ डीटीपी व झेरॉक्स सेंटरमध्ये कामानिमित्त जात होता. दुकानाचा मालक गणेश कपाळेची एसटीएसने बुधवारी चौकशी केली. दुकानातील संगणकाची हार्ड डिस्क एटीएसने ताब्यात घेतली.
नालासोपारा स्फोटकांप्रकरणी दोघांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 5:15 AM