जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडत आहे. सोमवारी संध्याकाळी प्रचार तोफा थंडावल्या. काँग्रेसकडून आता वैयक्तिक भेटी घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे.निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष प्रचारासाठी सोमवारी संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंतची वेळ दिली होती. त्यानुसार काँग्रेसच्या विविध प्रभागातील उमेदवारांनी दिवसभर प्रचार सभा, रॅली, पॉम्प्लेट देत प्रचार केला.संध्याकाळी साडे पाच नंतर उमेदवार व त्यांच्या नातेवाईकांनी घरोघरी जाऊन मतदान करण्याचे आवाहन केले. त्यात एकगठ्ठा मतदान असलेल्या कुटुंबांमध्ये जाऊन मतदानाबाबत आवाहन केले. ज्या ठिकाणी मतदारांसोबत उमेदवाराचा परिचय नाही अशा ठिकाणी परिचयातील नातेवाईक व मित्रांना पाठविण्यात आले.प्रभागात मतदान असले तरी अन्य ठिकाणावरील रहिवासी असलेल्या मतदारांची घरे शोधण्याचे काम काही उमेदवारांकडून नातेवाईक व कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे. त्यानुसार मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची व सोडण्यासाठी वाहनांची देखील तयारी करण्यात आली. मतदानासाठी आवश्यक असलेल्या मतदान चिठ्ठयांच्या वाटपाच्या कामाची जबाबदारी देखील गल्लीनिहाय कार्यकर्त्यांकडे सोपविण्यात आली.
जळगावात आता वैयक्तिक भेटी घेऊन मतदानाचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 7:30 PM
गेल्या काही दिवसांपासून जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडत आहे. सोमवारी संध्याकाळी प्रचार तोफा थंडावल्या. काँग्रेसकडून आता वैयक्तिक भेटी घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे.
ठळक मुद्देसोमवारी संध्याकाळी प्रचार तोफा थंडावल्याउमेदवारांनी घरोघरी जाऊन घेतल्या मतदारांच्या भेटीमतदान चिठ्ठया वाटपाची जबाबदारी दिली कार्यकर्त्यांकडे