जळगाव- घरफोडी गुन्ह्यातील अटकेत असलेल्या संशयित मोनूसिंग जगदीशसिंग बावरीने जिल्हापेठच्या कोठडीत स्वत:वर लोखंडी पट्टीने वॉर करून जखमी करून घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता घडली. हातासह पोटावर जखमा झाल्यामुळे त्यास त्वरित जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांनी सोनूसिंग बावरी याला अटक केली होती़ नंतर त्याने शहरातील अनेक घरफोड्यांची माहिती पोलिसांना दिली होती़ तर गुन्ह्यातील मुद्देमालही त्याच्याकडून जप्त करण्यात आला होता़ या गुन्ह्यात रामानंद नगर पोलिसांनी सोनूसिंगचा लहान भाऊ मोनूसिंग बावरी याला गुरुवारी अटक केली होती. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला २५ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ मात्र, रामानंद नगर पोलीस ठाण्यात पोलीस कोठडी नसल्याने संशयित मोनुसिंगला जिल्हापेठ कोठडीत पाठविण्यात आले. मोनुसिंगला कोठडीत टाकताच त्याने पगडीला असलेली लोखंडी क्लिपने स्वत:च्या हातावर व छातीवर वार करून जखमी करून घेतले.जिल्हा रूग्णालयात उपचारमोनूसिंग बावरी या अट्टल घरफोड्याने स्वत:वर वार करून घेतल्याचे पोलिसांना कळताच त्यांनी त्वरित त्यास जिल्हा रूग्णालयात हलविले़ त्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले़ यावेळी जिल्हापेठ पोलिसांसह रामानंदनगर पोलिसांनी रूग्णालयात हजेरी लावली होती़
अट्टल घरफोड्याने स्वत:वर केले लोखंडी पट्टीने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 10:38 PM