जळगाव : ६८ वर्षात झाली नाही एवढी कामे सध्या जळगाव जिल्ह्यात झाली. जिल्ह्यातल्या अनेक सिंचन प्रकल्पांना गिरीश महाजन यांनी मान्यता दिली. मेगा रिचार्ज सारखा प्रकल्प या जिल्ह्यात होत आहे. त्यामुळे भविष्यात या जिल्ह्याचे चित्र बदलेल दिसेल. जिल्ह्यात सिंचन क्रांती होताना दिसेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथील सागर पार्कवर आयोजित सभेत दिले.हुडको कर्जातून मुक्ती देऊजळगाव शहरास भविष्यात निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. हुडको कर्ज प्रकरणी दिल्लीत एक बैठक झाली मात्र आचारसंहिता लागल्याने तूर्त हा विषय मागे पडला. मात्र भविष्यात जळगाव महापालिकेची हुडकोच्या कर्जातून मुक्ती मिळवून देऊ.मामा- दादा एकत्र आलेमाजी मंत्री सुरेशदादा जैन - आमदार सुरेश भोळे एकत्र आहेत. धक्का देण्यासाठी आता सुरेशदादा बरोबर आले आहेत. त्यांनी सांगितले लाखाचे मताधिक्य देऊ. आता जबाबदारी गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांची आहे. लाखाचे नाही सव्वा लाखाचे मताधिक्य मिळाले पाहिजे. शेती अशी करा की या शहरात फक्त कमळाचेच पिक आले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.बॅकड्रॉप वरून आमदार स्मिता वाघ, जि.प. अध्यक्षांचा फोटो गायबजळगाव शहरात आयोजित विजय संकल्प सभेच्या व्यासपीठावर जिल्ह्यातील युतीच्या आमदारांचे छायाचित्र टाकण्यात आले होते. मात्र त्यावर विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांचे छायाचित्र नव्हते. याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होताना दिसत होती.गुलाबरावांनी घेतला चिमटासहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मी शिवसेनेचा सैनिक आहे असे सांगून आदेश होताच त्याची अंमलबजावणी करीत आहे असे सांगताना अगदी खडसे यांनी आयोजित केलेल्या सभेलाही आपण गेलो होतो असे सांगितले. आपल्या कार्यातील पंगतीत कोणीही वाढते दुसऱ्याच्या पंगतीत वाढण्यासाठी मन मोठ ठेवावे लागते पण आपणही दानत ठेवा असा चिमटा यावेळी गुलाबराव पाटील यांनी घेतला.दोघे गुलाबराव...मी पाटील ते देवकरमनपा निवडणुकीत राष्ट्रवादी शून्य झाली. देवकर यांनी त्यावेळी नेतृत्व केले होते. ते गुलाबराव मी गुलाबराव पण मी पाटील ते देवकर आहेत. ते पूर्वी सुरेशदादांसमवेत शिवसेनेत होते,असेही गुलाबराव पाटील आपल्या भाषणात म्हणाले. ही युती स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपीनाथ मुंडे व स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आहे. आपण कोठे लागतो. आज मोठे नेते लव्ह मॅरेज करू शकतात मग आपण काय केलं.... असे गुलाबराव पाटील म्हणताच एकच हंशा पिकला.सागर पार्क मैदानावर झालेल्या या सभेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार सुरेश भोळे, उमेदवार आमदार उन्मेष पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, भारिपचे अनिल अडकमोल, अरविंद देशमुख यांची भाषणे झाली.
जळगाव जिल्ह्यात सिंचन क्रांती होताना दिसेल- मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 9:55 PM