भुसावळ, जि.जळगाव : कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे बऱ्याच नागरिकांना दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न भेडसावत आहे. यासाठी मदतीचा हात म्हणून इस्कॉन भुसावळतर्फे ६० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या.आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) या संस्थेतर्फे मुंबई, पुणे, नागपूर, अहमदाबाद, दिल्ली व इतर ठिकाणी दिवसाला जवळजवळ ३०-४० हजार लोकांना जेवण पुरविण्यात येत आहे. या अनुषंगाने इस्कॉनतर्फे फक्त मजुरीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाºया भुसावळ शहराला लागून असलेल्या मिरगव्हाण व खेडी खुर्द येथील ६० कुटुंबांना साखर, तेल व तुरडाळीचे इस्कॉन व्यवस्थापक रासयात्रा प्रभूजी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी पिंप्रीसेकम येथील ग्रामविकास अधिकारी संजय भारंबे, सावदा येथील परिरक्षण भूमापक प्रदीप माळी, इस्कॉन भुसावळ येथील मनोहर प्रभू व डॉ.राजेंद्र फिरके उपस्थित होते.
भुसावळात इस्कॉनतर्फे गरजूंना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2020 2:20 PM