शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
2
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
3
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
4
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
6
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
7
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
9
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
10
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
11
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
12
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
13
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
14
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
15
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
16
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
17
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
18
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
19
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
20
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

चाळीसगावच्या आ.बं.विद्यालयास आयएसओ मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 5:23 PM

शिक्षण प्रसाराची १०९ वर्षांची परंपरा असणाऱ्या चाळीसगाव शिक्षण संस्थेच्या आ.बं. (मुलांच्या) विद्यालयास आयएसओ मानांकन मिळाले असून, मंगळवारी संचालक मंडळासह शिक्षकांनी मानांकनाचे स्वागत केले.

ठळक मुद्देशिक्षण परंपरेला सन्मानाचे तोरणसंस्थेला शतकोत्तर परंपरासौर उर्जेचा करणार वापर

चाळीसगाव, जि.जळगाव : शिक्षण प्रसाराची १०९ वर्षांची परंपरा असणाऱ्या चाळीसगावशिक्षण संस्थेच्या आ.बं. (मुलांच्या) विद्यालयास आयएसओ मानांकन मिळाले असून, मंगळवारी संचालक मंडळासह शिक्षकांनी मानांकनाचे स्वागत केले.चाळीसगाव शिक्षण संस्थेची स्थापना १९०९ मध्ये झाली असून, खान्देशातील शतकोत्तर शैक्षणिक वारसा जपणारी ही संस्था आहे. आ.बं.विद्यालयात शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविला आहे. संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली अलिकडेच संस्था विकासाचा कृती कार्यक्रम आखण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ केंद्रस्थानी ठेऊन बालवाडी ते महाविद्यालय स्तरावर अनेकविध उपक्रम राबविले जात आहे. मंगळवारी नारायणदास अग्रवाल, अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सचिव डॉ. विनोद कोतकर, योगेश अग्रवाल यांनी मुख्याध्यापक साहेबराव मोरे यांचे अभिनंदन केले.संचालक मंडळाची साद, माजी विद्यार्थ्यांची साथ!गेल्या वर्षभरात संस्थेत शिकून गेलेल्या माजी विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालक मंडळाने शाळा विकासासाठी मदतीची साद घातली. याला माजी विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आ.बं.विद्यालयाची मुख्य इमारतही १०९ वर्ष जुनी असूनही इमारत ऐतिहासिक ठेवा म्हणून जतन केला जाणार आहे. माजी विद्यार्थ्यांच्या दातृत्वातूनच इमारतीची डागडुजी करण्यासह नूतनीकरणही करण्यात येत आहे. मुख्य प्रवेशव्दारही विद्यार्थ्यांच्या आर्थिक योगदानामुळे उभारले गेले. शिक्षक - प्राध्यापक, निवृत्त कर्मचाऱ्यांनीदेखील आर्थिक मदत दिली आहे.सौर उर्जेचा करणार वापरसंस्थेचे संचालक योगेश अग्रवाल यांनी आपल्या समकालिन माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून आ.बं. विद्यालय पर्यावरणस्नेही बनविण्याचा संकल्प केला आहे. सौर उर्जेचा युनिट बसवून ते वीज बिलापासून शाळेची मुक्ती करणार आहे. शाळास्तरावर असणाºया बहुविध सुविधा, शैक्षणिक परंपरा, सुरू असणारे उपक्रम याची दखल घेऊनच आयएसओ मानांकन मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक साहेबराव मोरे यांनी व्यक्त केली.गेल्या ५१ वर्षांपासून संस्थेत कार्यरत आहे. सभासद आणि पालकांचा विश्वास सार्थ ठरवितानाच विद्यार्थी केंद्रबिंदू, शिक्षक मानबिंदू हे ब्रीद घेऊनच काम केले. संस्थेच्या विकासात माजी विद्यार्थी व निवृत्त कर्मचाऱ्यांसह सेवेत असणाºया कर्मचाºयांचेदेखील मोठे योगदान आहे. संचालक मंडळातील सहकारीदेखील निस्वार्थ भावनेने काम करणारे आहेत. याची फलश्रुती म्हणजेच आयएसओ मानांकन आहे.- नारायणदास अग्रवालमॅनेजिंग बोर्ड चेअरमन, चाळीसगाव शिक्षण संस्था, चाळीसगाव, जि.जळगाव

टॅग्स :Educationशिक्षणChalisgaonचाळीसगाव