जळगाव : मनपाच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत रामदास कॉलनी चौक, रामानंदनगर रस्त्यावरील अतिक्रमणांचा विषय गाजला. अखेर पुढील आठवडय़ात नोटरी नसलेल्या या ठिकाणच्या सर्व अतिक्रमणांवर कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले. नोंदणी केलेल्यांचीच पर्यायी व्यवस्था करणारआयुक्तांनी सांगितले की, ज्यांनी मनपाकडे नोंदणी केली असेल त्यांचीच पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी मनपा घेणार आहे. तसेच पुढील आठवडय़ात या सर्व अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण निमरूलन विभागाच्या अधीक्षकांना दिले. अतिक्रमणे हटविण्यास अडचण काय ?स्थायी समितीच्या सभेत मनसेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी रामदास कॉलनीच्या मु.जे. महाविद्यालयाजवळील चौकात रस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांचे तसेच काही टप:यांचे अतिक्रमण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी लोकशाहीदिनात दोन-तीन वेळा तक्रारी केल्या. तसेच अतिक्रमण निमरूलन विभागाचे अधीक्षक एच.एम. खान यांच्याकडेही तक्रार केली. मात्र या अतिक्रमणांवर कारवाई तर झालीच नाही, उलट अतिक्रमण निमरूलन विभागाचे कर्मचारी अतिक्रमणधारकांना नगरसेवकांची तक्रार आहे. त्यांना भेटून घ्या, असे सांगत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून देत कारवाई का होत नाही? याचा जाब विचारला. त्यावर अधीक्षक खान यांनी दूध केंद्राची मुदत संपली असल्याने त्यास काही मुदत दिली. तसेच टप:यांनाही मुदत दिली. तर भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करू नये असे नगरसेविका उज्जवला बेंडाळे यांचे म्हणणे असल्याने कारवाई केलेली नसल्याचे सांगितले. त्यावर बेंडाळे यांनी टपरीधारकांवर कारवाई करू नका, असे सांगितलेले नाही. केवळ भाजीपाला विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी मनपानेच आम्हाला पत्र देऊन जागा सुचविण्यास सांगितले असल्याने पर्यायी व्यवस्था होईर्पयत कारवाई करू नका, असे सांगितले. मात्र त्यांच्यावरही कारवाईस आपला विरोध नसल्याचे सांगितले.सर्वच अतिक्रमण पूर्वीसारखेचनगरसेवक जोशी यांनी शहरातील सर्वच अतिक्रमण पूर्वीसारखे झाले आहे. मग हे नवीन भाजीपाला विक्रेते कुठून आले? असा सवाल केला. तर नगरसेविका बेंडाळे यांनी रामानंदनगर रस्त्यावरील निम्मे अतिक्रमण अद्यापही जैसे-थेच असून गिरणा टाकीच्या भिंतीलगतही पक्के अतिक्रमण झाले आहे. त्यावरही कारवाई झालेली नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तर नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी आरटीओ ऑफीजवळील अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली.
जळगाव मनपाच्या स्थायी समिती सभेत गाजला अतिक्रमणांचा विषय
By admin | Published: April 07, 2017 7:05 PM