स्टार १०३१
जळगाव : वेगवेगळे उपवास व व्रत घेऊन आलेल्या श्रावण मासास सुरुवात होताच उपवासाच्या पदार्थांचे दर वाढू लागले आहेत. यामध्ये गेल्या महिन्याच्या तुलनेत शेंगदाण्याचे भाव प्रति किलो १० रुपये तर भगरच्या भावात २० रुपये प्रति किलोने भाववाढ झाली आहे.
दर का वाढले?
एकतर पाऊस नाही व कोरोनामुळे आवकवर परिणाम या दोन्ही घटकांचा परिणाम होत आहे. श्रावण महिन्यात मागणी वाढली असताना मागणीच्या तुलनेत पुरवठा नसल्याने भाववाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. साबुदाण्यापेक्षा भगरला पसंती वाढत असल्यानेही भगरच्या भावात जास्त वाढ होत आहे.
साबुदाणा आरोग्याला हानिकारक
- उपवास म्हटला म्हणजे साबुदाणा हमखास वापरला जातो. साबुदाणा हा पचायला जड असतो.
- रात्रीच्या वेळी साबुदाणा खाल्ल्यास फिरणे होत नाही व शरीराची हालचाल न झाल्याने पचन प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो.
- साबुदाण्यामुळे अपचन, आम्लपित्त या सारखा त्रास होऊ शकतो.
उपवास आहे, मग हे पदार्थ खा!
उपवास करायचा झाल्यास शक्यतो त्या दिवशी काही खाऊ नये. पाणी अथवा फळांचा रस उत्तम. मात्र भुकेले राहण्याची सवय नसल्यास फळांचे सेवन फायदेशीर आहे. या शिवाय राजगिऱ्याचे पदार्थ चांगला पर्याय आहे.
- निनाद चौधरी, आहारतज्ज्ञ.
उपवासाच्या पदार्थांचे दर
पदार्थ-जुलै-ऑगस्ट
भगर-१२०-१४०
शेंगदाणे-१०५-११५
साबुदाणा-६०-६५