जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा गावालगत पूर्णानदीपात्रात मृतावस्थेत आढळून आलेल्या पट्टेदार वाघाची हत्या झाली असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच वन्यजीव अभ्यासकांनी केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. या वाघाचे शवविच्छेदन सोमवार, १३ रोजी दुपारी १ वाजता चारठाणा येथे करण्यात आले. त्याचा अहवाल दोन दिवसांत प्राप्त होणार असून त्यात हत्या कशी झाली? हे स्पष्ट होणार आहे.थेरोळा येथे पट्टेदार वाघ रविवार, १२ आॅगस्ट रोजी मृतावस्थेत आढळून आला होता. त्यामुळे वन्यजीव अभ्यासक, तसेच वनविभागाच्या अधिकाºयांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली होती. रविवारी दुपारून हे अधिकारी व वन्यजीव अभ्यासक पोहोचल्यानंतर मृत वाघ पाण्यातून बाहेर काढण्यात आला.वीजप्रवाहाच्या धक्क्याने अथवा विष पाजल्यानेमृत्यूशेताच्या कुंपणावरील तारांमध्ये सोडलेल्या वीजप्रवाहाच्या धक्क्याने अथवा विष पाजल्यानेही झालेली असू शकते. मात्र मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवाल व फोरेन्सिक रिपोर्टवरूनच स्पष्ट होणार आहे. त्यानंतर तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे विवेक देसाई यांनी सांगितले. त्यासाठी वन विभागासोबतच वन्यजीव अभ्यासक, पर्यावरण प्रेमी तपास करणार आहेत.कातडी, नखे, सुळे व इतर सर्व अवयव शाबूतमृत वाघाचे शरीर संपूर्णपणे कुजलेले होते. त्यासाठीच त्यास पाण्यात टाकून ठेवण्यात आलेले होते. मात्र त्याची कातडी, नखे, सुळे व इतर सर्व अवयव शाबूत असल्याने शिकारीच्या उद्देशाने ही हत्या झालेली नसल्याचे मत वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. तसेच या वाघाचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याची हत्याच झाली आहे. मात्र ती ठरवून झालेली नसावी.वाघाला दोरीने बांधून ओढत आणलेवाघाची हत्या झाली आहे, हे स्पष्ट असले तरीही शिकारीच्या दृष्टीने ती झालेली नसल्याचा दावा उपवनसंरक्षक डी.डब्ल्यू. पगार यांनीही ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. वाघाची हत्या झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यास कमरेस व पुढील पायाला नायलॉनची दोरी बांधून ओढत आणून पाण्यात टाकण्यात आले. पाण्यात दोन-चार दिवस राहिल्याने वाघाच्या शरीर संपूर्णपणे कुजले असल्याचे त्यांनी सांगितले.मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवाल व फोरेन्सिक रिपोर्ट आल्यावरच स्पष्ट होईल.यापूर्वीचा वाघाचा मृत्यू नैसर्गिकयापूर्वी डोलारखेडा परिसरात एका शेतात वाघाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले होते. त्याचा शवविच्छेदन अहवाल तसेच फॉरेन्सिक विभागाचाही अहवाल वनविभागाला प्राप्त झाला होता. त्यात त्या वाघाचा वृद्धापकाळाने मृत्यू झाल्याचे तसेच विषबाधा झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले असल्याचे उपवनसंरक्षक पगार यांनी सांगितले.
मुक्ताईनगर तालुक्यातील ‘त्या’ वाघाची हत्या झाल्याचे स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:19 AM
पुरावा नष्ट करण्यासाठी नदीत फेकले
ठळक मुद्देदोन दिवसात अहवाल येणारकातडी, नखे, सुळे व इतर सर्व अवयव शाबूत