टर्बोनेटर हरभजन सिंग, ज्याने आपल्या फिरकीच्या जोरावर एकेकाळी जगातील भल्याभल्या फलंदाजांना नाचवले आहे. ज्याने २३६ वन डे सामन्यात २६९ आणि
१०३ कसोटीत ४१३ बळी घेतले आहेत आणि आयपीएलमध्ये १५० बळी घेतले आहेत.
त्या हरभजन सिंगने आपला अखेरचा बळी ७०१ दिवस आधी म्हणजेच १२ मे २०१९ ला
घेतला होता.
२०१९ च्या आयपीएल सत्रात हरभजन सिंग चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत होता.
त्यात त्याने क्वालिफायर २ सामन्यात दिल्लीच्या शेफ्रॉन रुदर फोर्ड याला
बाद केले होते. या सामन्यात त्याने दोन बळी घेतले होते. रुदरफोर्ड हा
त्याचा अखेरचा बळी होता. त्यानंतर हरभजन पुढे आयपीएलमध्ये खेळलाच नाही.
२०२० च्या सत्रात तो यूएईत खेळला नाही. त्यानंतर त्याला चेन्नईने रिलीज
केले. २०२१ च्या त्याचवेळी त्याला केकेआरच्या ताफ्यात जागा मिळाली आहे.
पहिल्या सामन्यात सनरायजर्सकडून खेळला; पण त्याला एकही बळी मिळाला नाही.
दुसऱ्या सामन्यातही सुरुवात करण्याची त्याला संधी मिळाली; मात्र
मुंबईच्या रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या जोडीपुढे त्याला फारशी चमक दाखवता आली नाही.
या सामन्यातही केकेआरने मुंबईच्या सर्वच्या सर्व दहा गडी बाद केले. रसेल
याने पाच बळी घेतले, मात्र हरभजन सिंह याने दोन षटकांत १७ धावा दिल्या.
त्याला एकही बळी मिळवता आला नाही.