जळगाव- आपण फक्त यशस्वी व्हायचा विचार करतो, फक्त विचार करून उपयोग नाही तर यशस्वी होण्याची भूक असावी लागते, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतील पंच अनिश सहस्त्रबुध्दे यांनी केले़सोमवारी आयएमआर महाविद्यालयात मोटीव्हेशनल कार्यक्रमातंर्गत यश म्हणजे यश असते या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला़ त्याप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर डॉ़ शिल्पा बेंडाळे यांची उपस्थिती होती़स्वप्नांना डेडलाईन दिली की गोल पुर्ण होतोसहस्त्रबुध्दे पुढे म्हणाले की,तुमचे संभाषण कौशल्य वाढवा, चांगले इंग्लिश येण्यासाठी तुम्हाला किमान तीन शब्द येणे गरजेचे आहे पण विचार करा तुम्हाला मराठीतले तीन हजार शब्द येतात का? मला शाळेत असतांना कधीही ३५,५०,५५ यापेक्षा जास्त मार्क मिळायचे नाही. पण बाबा म्हणाले फक्त शून्य आणू नको.. बाकी किती ही घे.. आज मी अनेक एमबीए कॉलेजला गेस्ट लेक्चरर म्हणुन जोडलो गेलो आहे. पाय ओढणाऱ्यांसमोर मांडी मारुन बसा, त्यांना तुमचे पायच सापडणार नाही. आपण स्वप्न बघतो पण गोल नाही ठरवत. स्वप्नाला डेडलाईन दिली की गोल पूर्ण होतो. जगताना आज पुरते जगा पण प्लॉन करताना आयुष्यभराचा करा, असे त्यांनी सांगितले़ सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले़अनुभव केले विद्यार्थ्यांजवळ व्यक्तअनिश सहस्त्रबुद्धे यांनी आपले आतंरराष्ट्रीयस्तरावरील पंच म्हणुन आलेले अनेक अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले़ जी मॅच तुम्ही टिव्ही वर घरी बसुन बघत असतात ती तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध अॅगल नी ५४ कॅमेरे, १७० लाईट, आणि ७०० हॅलोजन सुरु असतात. त्यांना जो डायरेक्ट करतो त्याच्या समोर ५० ते ५५ टिव्ही सेट असतात. तो व्यक्ती ३ तास कोणत्याही कारणासाठी ती जागा सोडू शकत नाही. आणि त्याचा असिस्टंट डायरेक्टर सलग २०० देशांच्या संपर्कात असतो जिथे ही मॅच दाखवली जात असते. तर आम्ही पंच दोन्ही खिश्यात वॉकी टॉकी घेऊन, स्टेडियमच्या बाहेर प्रचंड गोंगाट सुरु असतांना अनेक व्यवधाने सांभाळून कानामध्ये डायरेक्ट येणाºया सुचनांवर लक्ष ठेवून असतो. जसे तुम्ही तुमच्या मोबाईल अपडेट करता तसा मी माझे लाईफ अपडेट करतो, असे त्यांनी सांगितले़
फक्त विचार करून उपयोग नाही, यशस्वी होण्याची भूक असावी लागते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 10:15 PM